लोणी काळभोरमध्ये घराचे कुलूप तोडून तीन लाखांचा ऐवज लांबवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:33 IST2026-02-13T17:32:20+5:302026-02-13T17:33:43+5:30
बुधवार पेठेतील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख २५ हजार रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेले.

लोणी काळभोरमध्ये घराचे कुलूप तोडून तीन लाखांचा ऐवज लांबवला
पुणे : लाेणी काळभोर भागात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोणी काळभोरमधील पठारे वस्ती भागात राहायला आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील दोन लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना नुकतीच घडली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
दरम्यान, बुधवार पेठेतील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख २५ हजार रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेले. याबाबत एका व्यावसायिकाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व्यावसायिकाचे बुधवार पेठेत इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणारे दुकान आहे. चोरट्यांनी ११ फेब्रुवारी राेजी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडून इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरे करत आहेत.