शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : दहा मिनिटांत परत येतो म्हणत नेले अन्… सौरभ कसबेच्या मृत्यूमागे नेमके काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 14:04 IST

सौरभ कसबेच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

भिगवण : मदनवाडी (ता. इंदापूर) येथे उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या सौरभ कसबे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अनिकेत भिसे यांनी भिगवण पोलिस ठाण्यात केली आहे.

१५ फेब्रुवारी रोजी एका हॉटेल व्यावसायिकाने आणि त्याच्या साथीदाराने सौरभ कसबे यांना दुपारी २ वाजेच्या सुमारास ''दहा मिनिटांत परत येतो'' असे सांगून घरातून नेले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सौरभ यांना विजेचा धक्का बसल्याचा फोनवरून कळविण्यात आले. त्यांना त्वरित तक्रारवाडी येथील लाइफलाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथील डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना विजेचा तीव्र धक्का बसल्याने ते गंभीर स्थितीत होते. उपचार सुरू असताना ५ मार्च रोजी सौरभ यांचा मृत्यू झाला. चौकशीत संबंधित हॉटेलचालक आणि त्याच्या साथीदाराने सौरभ यांना वेल्डिंगच्या दुकानावर नेल्याचे समोर आले आहे. त्या ठिकाणी उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या तारेवर विद्युत आकडा टाकण्यास सांगितल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी सौरभ यांना विजेचा तीव्र धक्का बसून ते गंभीर जखमी झाले.घटनास्थळी संबंधित दोघे उपस्थित असूनही त्यांना वाचविण्यासाठी कोणताही प्रयत्न केला गेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे. सौरभ हे कुटुंबातील कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या मृत्यूसाठी संबंधित दोनच जबाबदार असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कसबे कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या मागणीची दखल न घेतल्यास मातंग समाज तसेच इतर संघटनांच्या वतीने भिगवण पोलिस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही अनिकेत भिसे यांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indapur: Man dies after electric shock; foul play suspected.

Web Summary : Saurabh Kasbe died from an electric shock after being taken from his home. A formal complaint alleges negligence and forced dangerous work. Police investigation demanded.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या