शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोरांनी कुटुंबावर केला जीवघेणा हल्ला; तरुणाचा मृत्यू, आई-वडील, बहीण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:16 IST

११ वाजण्याच्या सुमारास तीन चड्डी-बनियनधारी हल्लेखोरांनी घरात घुसून कुटुंबावर बेदम मारहाण

पुणे -  यवत स्टेशन रोडवरील नीलकंठेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या शशिकांत चव्हाण यांच्या घरात मध्यरात्री घडलेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काल (दि. ५) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तीन चड्डी-बनियनधारी हल्लेखोरांनी घरात घुसून कुटुंबावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अविनाश ऊर्फ विश्वजीत शशिकांत चव्हाण याचा मृत्यू झाला असून, शशिकांत चव्हाण, प्राची यादव आणि उज्वला चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेचा थरारहल्लेखोरांनी प्रथम घराबाहेर आलेल्या अविनाश चव्हाण याच्यावर हल्ला केला. त्यानंतर घरात घुसून कुटुंबातील तिघांवर अमानुष मारहाण करण्यात आली. मात्र, मयत अविनाश याची पत्नी सारीका चव्हाण हिने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह बाथरूममध्ये लपून जीव वाचवला. तिने तत्काळ शेजाऱ्यांना मदतीसाठी हाक दिली.

शेजारी अरुण मुळीक व संतोष मुळीक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या चाहुलीने हल्लेखोर पळून गेले. यानंतर दीपक मुळीक, लक्ष्मण मुळीक, प्रणव मुळीक आणि कुमार मुळीक यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पसार झाले.

पोलीस तपास सुरूघटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस आणि पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत श्वानपथक (डॉग स्क्वॉड) पाचारण केले आहे. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की त्यामागे काही अन्य कटकारस्थान आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे यवत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक