तुम्हा सर्वांना जिवंत सोडणार नाही..! धमकी देत चुलत्याकडून पुतण्यावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 16:01 IST2025-09-04T16:00:45+5:302025-09-04T16:01:08+5:30
पिंपरी : कौटुंबिक वादातून चुलत्याने आपल्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. १ सप्टेंबर) सकाळी अकराच्या सुमारास ...

तुम्हा सर्वांना जिवंत सोडणार नाही..! धमकी देत चुलत्याकडून पुतण्यावर जीवघेणा हल्ला
पिंपरी : कौटुंबिक वादातून चुलत्याने आपल्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. १ सप्टेंबर) सकाळी अकराच्या सुमारास निगडी येथे घडली. महेश ज्ञानोबा काळभोर (३५, रा. समर्थनगर, निगडी) यांनी देहुरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तुकाराम सखाराम काळभोर (६०, रा. समर्थनगर, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित तुकाराम हा फिर्यादीचा चुलता आहे. त्याने फिर्यादीच्या कर्मचाऱ्यास पार्किंगसमोर गाड्या पार्क करू नये म्हणून शिवीगाळ केली.
फिर्यादीचा भाऊ जाब विचारण्यासाठी गेला, या कारणावरून आणि जुन्या भांडणाच्या रागातून संशयिताने लोखंडी फावड्याने फिर्यादीच्या भावाच्या डाव्या भुवईवर मारून गंभीर दुखापत केली. तसेच, ‘तुम्हा सर्वांना जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देऊन तो निघून गेला.