Pune Crime: सावधान..! आता एका क्लिकमध्ये लाखोंचा गंडा; ज्येष्ठांसह नवख्यांवर सायबर गुन्हेगारांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:43 IST2026-04-12T14:43:25+5:302026-04-12T14:43:43+5:30

बारामती शहरातील तिघेजण अडकले सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात; सायबर चोरांनी फसवणुकीच्या ३ वेगवेगळ्या प्रकरणांत अनेकांना २ कोटी ६८ लाखांचा घातला गंडा

pune crime news Beware..! Now lakhs of rupees can be stolen in one click; Cyber criminals are targeting both the elderly and the newbies | Pune Crime: सावधान..! आता एका क्लिकमध्ये लाखोंचा गंडा; ज्येष्ठांसह नवख्यांवर सायबर गुन्हेगारांचे लक्ष

Pune Crime: सावधान..! आता एका क्लिकमध्ये लाखोंचा गंडा; ज्येष्ठांसह नवख्यांवर सायबर गुन्हेगारांचे लक्ष

बारामती : जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, विविध फसवणुकीच्या पद्धतींद्वारे नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळ्यांचे जाळे अधिक सक्रिय होत असल्याचे समोर येत आहे. अलीकडच्या काळात बनावट कॉल, फिशिंग लिंक, केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक, तसेच गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना जाळ्यात ओढले जात आहे. काही प्रकरणांत आरोपी स्वतःला बैंक अधिकारी, पोलिस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून खात्यातील रक्कम उकळत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि नव्याने ऑनलाइन व्यवहार करणारे लोक या गुन्ह्यांचे प्रमुख बळी ठरत आहेत.

सायबर फसवणुकीद्वारे एकूण १२.६७ कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. यात डिजिटल अरेस्ट, आयपीओ गुंतवणूक, बँक खाते करून मोठ्या रकमेची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगार प्रथम नागरिकांचा विश्वास संपादन करतात आणि नंतर विविध युक्त्या वापरून त्यांची आर्थिक फसवणूक करतात. यातून एक महत्त्वाचा धडा मिळाला आहे. पहिल्या घटनेत ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेला व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडीओ कॉल करण्यात आला. 

फोनवर लिस गणवेशात असलेल्या व्यक्तीने स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून अटक वॉरंट असल्याचे खोटे सांगितले आणि तिच्या पैशांचा वापर करून त्यांना धमकावले. महिलेला कोणाशीही संपर्क साधण्यास मज्जाव करण्यात आला आणि तपासाच्य नावाखाली तिचे पैसे सुरक्षित खात्यात जमा करण्यास सांगितले. या प्रकारामुळे महिलेला एकूण १४५.६० लाखांच नुकसान झाले.

दुसऱ्या घटनेत एक नागरिकाला व्हॉट्सअॅपवरील "स्टॉक मार्केट एक्सपर्टस" नावाच्या ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. ग्रुपच्य सदस्यांनी शेअर मार्केट, आयपीओ आणि ट्रेडिंगमध्ये मोठा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि खोट्य मोबाइल अॅपच्या माध्यमातून ₹१.३० कोटींची फसवणूक केली. तिसऱ्या घटनेत शहर पोलिस स्टेशन हद्दीत ९२.५० लाखांचा मोठा अपहार करण्यात आला यात, गिरीराज हॉस्पिटल, बारामती आणि संबंधित खातेदारांच्या बँक खात्यांमधून अनधिकृत ऑनलाइन व्यवहार करण्यात आले.

तीन फसवणुकीच्या घटना उघडकीस आल्या

गेल्या काही दिवसांत बारामती शहर पोलिस स्टेशन हद्दीत तीन गंभीर सायबर फसवणुकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत, ज्यामध्ये तीन नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.


नागरिकांनी ध्यानात ठेवावे की, जर कोणी स्वतःला पोलिस, सीबीआय, ईडी किंवा इतर सरकारी अधिकारी असल्याचे सांगून फोन किंवा व्हिडीओ कॉलवर अटक किंवा कारवाईची भीती दाखवली तर त्यावर विश्वास ठेवू नये. सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा.
-  श्रीशैल चिवडशेट्टी, पोलिस निरीक्षक, बारामती शहर

 

सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री टाळा. सायबर गुन्हा झाल्यास तातडीने १९३० क्रमांकावर संपर्क साधत तक्रार करावी. डिजिटल साक्षर असल्यास cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार दाखल करावी. सायबर फसवणूक झाल्यापासून तीन तासांच्या आत तक्रार दाखल केल्यास ९९ टक्के रक्कम परत मिळण्याची शक्यता असते, असे शासन सांगते. त्यामुळे नागरिकांनी 'अलर्ट' राहावे आणि त्यांची तक्रार तातडीने करावी. - अॅड. तुषार झेंडे पाटील, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य 

Web Title : पुणे अपराध: साइबर अपराधियों का बुजुर्गों, नौसिखियों पर निशाना; क्लिक में लाखों का नुकसान

Web Summary : बारामती में साइबर धोखाधड़ी बढ़ी, ₹12.67 करोड़ का नुकसान। धोखेबाज अधिकारी बनकर, झूठे निवेशों से लुभाते हैं। पीड़ितों में वरिष्ठ नागरिक और नए ऑनलाइन उपयोगकर्ता शामिल हैं। धोखाधड़ी की सूचना तुरंत 1930 पर दें।

Web Title : Pune Crime: Cybercriminals Target Elderly, Newbies; Lakhs Lost in Clicks

Web Summary : Baramati sees surge in cyber fraud, with ₹12.67 crore lost. Scammers impersonate officials, lure with fake investments. Victims include seniors and new online users. Report fraud to 1930 immediately for best recovery chances.