Ganesh Kale Murder: प्लॅन जेलमध्ये, शस्त्र घेण्यासाठी दिले ४५ हजार रुपये; बंडू आंदेकरने सहा महिन्यांपूर्वीच दिली होती गणेश काळेची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 09:42 IST2025-11-04T09:41:25+5:302025-11-04T09:42:36+5:30
Ganesh Kale Murder Case: आंदेकरने दिलेली सुपारी कोंढवा येथे प्रभाव असलेल्या टोळीचा प्रमुख आमीर खानने कारागृहातून वाजवली आहे. यासाठी त्याने त्याचा शूटर अमन शेख याला शस्त्र घेण्यासाठी ४५ हजार रुपये दिले होते.

Ganesh Kale Murder: प्लॅन जेलमध्ये, शस्त्र घेण्यासाठी दिले ४५ हजार रुपये; बंडू आंदेकरने सहा महिन्यांपूर्वीच दिली होती गणेश काळेची सुपारी
पुणे : रिक्षाचालक गणेश काळेच्या खुनाची बंडू आंदेकर याने सहा महिन्यांपूर्वीच सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आंदेकरने दिलेली सुपारी कोंढवा येथे प्रभाव असलेल्या टोळीचा प्रमुख आमीर खानने कारागृहातून वाजवली आहे. यासाठी त्याने त्याचा शूटर अमन शेख याला शस्त्र घेण्यासाठी ४५ हजार रुपये दिले होते. मात्र, हे दीर्घकालीन प्लॅनिंग पोलिसांच्या नजरेतून कसे सुटले? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोंढव्यातील खडी मशीन चौकात भरदिवसा झालेल्या गोळीबारात रिक्षाचालक गणेश काळे याचा खून करण्यात आला. हा खून वनराज आंदेकरच्या खून प्रकरणाचा सूड म्हणून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. ज्याप्रमाणे वनराज आंदेकरवर हल्ला केला, त्याच पद्धतीने गणेश काळे याच्यावर देखील सुरुवातीला गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले. आंदेकर टोळीचा
कोंढव्यातील खडी मशीन चौकात भरदिवसा झालेल्या गोळीबारात रिक्षाचालक गणेश काळे याचा खून करण्यात आला. हा खून वनराज आंदेकरच्या खून प्रकरणाचा सूड म्हणून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. ज्याप्रमाणे वनराज आंदेकरवर आहे. ज्याप्रमाणे वनराज आंदेकरवर हल्ला केला, त्याच पद्धतीने गणेश काळे याच्यावर देखील सुरुवातीला गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आणि त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर यांनी यासाठी सूचना दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीनांसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमीर खानची टोळी कोंढव्यात कार्यरत असली, तरी ती आंदेकर टोळीचाच एक भाग आहे. आमीर खान सध्या निखिल आखाडे खून प्रकरणात जेलमध्ये आहे. तेथे अमन शेखने त्याचीभेट घेतली होती. तेव्हा आमीरने अमनला बंडू अण्णांनी दिलेली सुपारी काहीही करून वाजवायची, असा आदेश दिला होता. त्यासाठी मध्य प्रदेशातून शस्त्र आणण्यासाठी पैशांची सोय करून दिली. यासाठी अमन शेख आणि अरबाज पटेल यांनी मुख्य भूमिका बजावली. तर अल्पवयीन मुलांनी रेकीचे काम केले. त्यांनी गणेशवर शनिवारी (दि. १) सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत पाळत ठेवली होती.
समर्थक रेकॉर्डवर...
आंदेकर टोळीचे समर्थक आणि नंबरकारी मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्वांना रेकॉर्डवर घेण्यात येणार आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील रिल्सचे चाहतेही पोलिसांच्या रडारवर आहेत. या सगळ्यांचे रितसर रेकॉर्ड तयार करून सराईत गुन्हेगारांप्रमाणेच त्यांची नियमित झाडाझडती घेण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले.
आणखी एक मकोका : अमितेश कुमार
गणेश काळे खूनप्रकरणी आंदेकर टोळीवर आणखी एक मकोका लावण्यात येणार आहे. या टोळीवर अगोदरच तीन मकोका आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.