फ्रेंड रिक्वेस्ट, ओळख अन् अत्याचार..; इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 20:25 IST2026-02-12T20:23:27+5:302026-02-12T20:25:14+5:30

- तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट अक्सेप्ट केल्यानंतर त्याने प्रपोज केले आणि प्रेमाचे जाळे विणले.

Pune Crime News An Instagram identity turned out to be fatal… What happened next was shocking | फ्रेंड रिक्वेस्ट, ओळख अन् अत्याचार..; इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली घातक

फ्रेंड रिक्वेस्ट, ओळख अन् अत्याचार..; इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली घातक

राजगुरूनगर : अल्पवयीन मुलीवर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैभव शिवाजी मुसळे (रा. कडूस ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे. खेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी शिक्षणानिमित्त नारायणगाव येथे राहत असून आरोपी वैभव मुसळे याने सुरुवातीला तिच्याशी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधला. तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट अक्सेप्ट केल्यानंतर त्याने प्रपोज केले आणि प्रेमाचे जाळे विणले. मुलीने नकार दिला, तरीही त्याने इन्स्टाग्राम आणि फोनवरून सतत संपर्क ठेवला व त्रास दिला. ऑगस्ट २०२५ मध्ये आरोपीने मुलीला मंचर, (ता. आंबेगाव) येथे बोलावले.

तेथे त्याने आपल्या चारचाकी गाडीने पुणे-नाशिक महामार्गालगत जैदवाडी (ता. खेड) येथील लॉजवर नेवून जबरदस्तीने बलात्कार केला. मुलीने घाबरून कोणालाही सांगितले नाही. यानंतर १५ सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा आरोपी वैभवने तिला खेड येथे बोलावले आणि त्याच स्काय लॉजमध्ये नेले. तेथे पुन्हा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरही त्याने इन्स्टाग्राम आणि फोनवरून तिला फॉलो करून त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Pune Crime News An Instagram identity turned out to be fatal… What happened next was shocking