लक्झरी ‘कार’ थांबवून मद्यधुंद पोराचे रस्त्यावरच मूत्रविसर्जन! जाब विचारताच अश्लील चाळे, पोलिस म्हणतात…
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:24 IST2025-03-08T15:21:11+5:302025-03-08T15:24:19+5:30
- शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने आपल्या चारचाकी वाहनातून उतरून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरच

लक्झरी ‘कार’ थांबवून मद्यधुंद पोराचे रस्त्यावरच मूत्रविसर्जन! जाब विचारताच अश्लील चाळे, पोलिस म्हणतात…
पुणे - पुण्यात मद्यधुंद तरुणाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात रस्त्यावरच अश्लील चाळे करण्याची हिम्मत या तरुणांनी केली आहे. आज सकाळी हे प्रकरण समोर आल्याची माहिती मिळाली आहे. या व्हिडिओवर पुणेपोलिसांनी माध्यमांशी बोलतांना माहिती दिली.
पोलीस अधिकार हिम्मत जाधव यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले,'पोलीस स्टेशन येरवडा हद्दीतील शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने आपल्या चारचाकी वाहनातून उतरून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरच लघुशंका करत अश्लील चाळे केल्याचे दिसून आले. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्यामुळे त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी शोध पथके रवाना केलेली आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.'
दरम्यान, येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात पुणे नगर रोडवर हा प्रकार घडला आहे. दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून थांबले आहेत. त्यापैकी एक तरुण गाडीतून उतरून रस्त्यावरच लघुशंका करताना व्हिडिओमधून दिसत आहे. तसेच त्यावेळी त्याने रस्त्यावरच स्त्रियांसमोर अश्लील चाले केल्याचे दिसून आले आहे. तर गाडीत बसलेल्या दुसऱ्या तरुणाच्या हातात दारुची बाटली आहे. दोघेही हुल्लडबाजी करताना दिसून येत आहेत. आजुबाजुच्या लोकांनी जाब विचारला असता ते फुल स्पीड मध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेल्याचे दिसते आहे.