14 कोटींची फसवणूक..! भोंदूगिरी करून फसवणूक करणाऱ्या पंढरपूरकर कुटुंबाचे ११३९ संशयास्पद बँक व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:22 IST2025-11-28T10:18:04+5:302025-11-28T10:22:50+5:30

- आरोपींना ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

pune crime news 1139 suspicious bank transactions of pandharpurkar family who committed fraud through fraud | 14 कोटींची फसवणूक..! भोंदूगिरी करून फसवणूक करणाऱ्या पंढरपूरकर कुटुंबाचे ११३९ संशयास्पद बँक व्यवहार

14 कोटींची फसवणूक..! भोंदूगिरी करून फसवणूक करणाऱ्या पंढरपूरकर कुटुंबाचे ११३९ संशयास्पद बँक व्यवहार

पुणे : भोंदूगिरी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक प्रकरणात पोलिसांकडून आरोपींची विविध खाती, वाहने व लॅपटॉप यातून ५४ लाख रुपयांची रक्कम जप्त व संरक्षित केली आहे. फिर्यादी व विविध बँक खाती यांच्याकडे चौकशीदरम्यान गुन्ह्यात फसवणूक झालेली रक्कम वाढलेली असून, ती १४ कोटी ३९ लाख २० हजार रुपये इतकी झाली आहे.

आरोपींच्या वेगवेगळ्या ३९ बँक खात्यांपैकी १३ बँकांची माहिती समोर आली असून, त्यात सुमारे ११३९ विविध संशयित बँक व्यवहार दिसून येत आहेत. त्यात १४ कोटी ३९ लाख रुपयांची रक्कम विविध ठिकाणी फिरविली आहे. त्यातून आरोपींनी काही मालमत्ता, वाहने घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांनी फिर्यादी व इतरांकडून घेतलेले सोने काही खासगी सावकारांकडे गहाण ठेवून सुमारे ६० लाख रुपयांचे कर्ज घेतले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

वेदिका कुणाल पंढरपूरकर (वय ४१, रा. महात्मा सोसायटी, कोथरूड), कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (४२), दीपक जनार्दन पंढरपूरकर (६५, रा. जय शंकर फार्महाऊस, वाडीवरे, नाशिक) या तिघा आरोपींना पोलिस कोठडी मिळण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात अर्ज केला होता. त्यांना प्रॉडक्शन वॉरंटवर न्यायालयात हजर करण्यात आले. सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी ३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

फिर्यादी यांना आरोपींनी मुलीचा आजार बरा करण्याचा बहाणा करून त्यांच्याकडून १३ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केली होती. सुरुवातीला पोलिस कोठडी घेतल्यानंतर पोलिस कोठडीचा हक्क अबाधित राखून न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. विशेष नोंदणी व महानिरीक्षक यांच्याकडून सुमारे ६ ते ७ विविध नोंदणी व त्याचे दस्त प्राप्त झालेले असून, त्याचा आरोपीकडे तपास करायचा आहे.

सावकाराकडे सोने गहाण ठेवून ६० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे सोने कोणत्या सावकाराकडे गहाण ठेवले आहे, त्याची आरोपीकडे चौकशी करायची आहे. यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष खतेमाळस यांनी ६ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली. फिर्यादी यांच्याकडून ॲड. विजयसिंह ठोंबरे आणि सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी काम पाहिले.

Web Title : पंढरपुरकर परिवार का धोखाधड़ी: ₹14 करोड़ का घोटाला, संदिग्ध बैंक लेनदेन उजागर

Web Summary : पंढरपुरकर परिवार ने इलाज के नाम पर ₹14 करोड़ की धोखाधड़ी की। पुलिस ने ₹54 लाख जब्त किए। 1139 संदिग्ध बैंक लेनदेन से मनी लॉन्ड्रिंग और संपत्ति खरीद का खुलासा हुआ। उन्होंने ₹60 लाख के लिए सोना भी गिरवी रखा।

Web Title : Pandharpurkar Family's Fraud: ₹14 Crore Scam, Suspicious Bank Transactions Uncovered

Web Summary : Pandharpurkar family defrauded ₹14 crore by feigning healing powers. Police seized ₹54 lakh. 1139 suspicious bank transactions revealed money laundering and asset purchases. They also pawned gold for ₹60 lakh.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.