Pune Crime : वैमनस्यातून अल्पवयीनांकडून तरुणावर कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 18:54 IST2025-11-15T18:52:34+5:302025-11-15T18:54:08+5:30
याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले चार आरोपी अल्पवयीन आहेत. अल्पवयीन आणि घोटणे हे ओळखीचे आहेत.

Pune Crime : वैमनस्यातून अल्पवयीनांकडून तरुणावर कोयत्याने वार
पुणे : वैमनस्यातून अल्पवयीनांकडून तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. टोळक्याने केलेल्या मारहाणीत दोनजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अल्पवयीनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभम घोटणे (२२, रा. भारती विद्यापीठ) याने फिर्याद दिली आहे.
पसार झालेल्या अल्पवयीनांचा शोध घेण्यात येत आहे. टाेळक्याने केलेल्या मारहाणीत शुभम घोटणे याच्यासह आर्यन गायकवाड, अथर्व मारणे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले चार आरोपी अल्पवयीन आहेत. अल्पवयीन आणि घोटणे हे ओळखीचे आहेत.
दोन वर्षांपूर्वी आरोपी आणि घोटणे यांच्यात वाद झाला होता. गुरुवारी रात्री घोटणे, त्याचे मित्र गायकवाड, मारणे हे मोहननगर भागात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी अल्पवयीन आरोपी दुचाकीवरून तेथे आले. त्यांच्याकडे कोयते होते. त्यांनी घोटणेवर कोयत्याने वार केले. त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांना मारहाण करून आरोपी पसार झाले. सहायक पोलिस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.