Pune Crime : पद्मावतीत मध्यरात्री धुमाकूळ; तरुणावर हल्ला, टेम्पोसह १०–१५ दुचाकींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:42 IST2026-01-21T12:42:25+5:302026-01-21T12:42:47+5:30

या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

Pune Crime Midnight stampede in Padmavati; Youth attacked, 10-15 bikes including tempo damaged | Pune Crime : पद्मावतीत मध्यरात्री धुमाकूळ; तरुणावर हल्ला, टेम्पोसह १०–१५ दुचाकींचे नुकसान

Pune Crime : पद्मावतीत मध्यरात्री धुमाकूळ; तरुणावर हल्ला, टेम्पोसह १०–१५ दुचाकींचे नुकसान

धनकवडी : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून टोळक्याने एका तरुणाला मारहाण करत लाकडी बांबू आणि कोयत्याने वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत, पद्मावती येथील खंडाळे चौकात घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी क्रिस चव्हाण आणि आरोपी यांच्यात वाद होते. क्रिस रात्री कामावरून घरी आल्यानंतर तिघांनी त्याला घराजवळ गाठले. तेथे बाचाबाची झाल्यानंतर तिघेही क्रिसला मारण्यासाठी धावले. क्रिस त्यांच्या तावडीतून पळून जात असताना त्यांनी दिसेल त्या वाहनांची तोडफोड केली.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर सहकारनगर पोलीस व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तोडफोड प्रकरणी दीपक कदम याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे.

Web Title : पुणे: पद्मावती में आधी रात को तोड़फोड़, युवक पर हमला, वाहन क्षतिग्रस्त

Web Summary : पुणे के पद्मावती में मामूली विवाद के बाद एक गिरोह ने एक युवक पर हमला किया और बांस की छड़ियों और दरांती से वाहनों को क्षतिग्रस्त कर दिया। पुलिस ने एक व्यक्ति, दीपक कदम को गिरफ्तार किया, उसके आपराधिक रिकॉर्ड की जांच कर रही है। घटना सुबह लगभग 2:30 बजे हुई।

Web Title : Pune: Midnight Vandalism in Padmavati, Youth Attacked, Vehicles Damaged

Web Summary : A gang attacked a youth in Padmavati, Pune, damaging vehicles with bamboo sticks and a sickle after a minor dispute. Police arrested one person, Deepak Kadam, investigating his criminal record. The incident occurred around 2:30 AM.