Pune Crime: हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याने मॅनेजरला मारहाण;गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:13 IST2026-04-09T16:11:05+5:302026-04-09T16:13:03+5:30
Pune Crime - मॅनेजर शेट्टी यांनी त्याला जेवणाचे बिल मागितले असता, संकेतने रागाच्या भरात आपल्याजवळील ॲक्टिव्हा गाडीची चावी शेट्टी यांच्या मानेवर आणि डोक्यावर मारली.

Pune Crime: हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याने मॅनेजरला मारहाण;गुन्हा दाखल
पिंपरी : खराळवाडी येथील एका हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याचा राग धरून एका ग्राहकाने हॉटेलच्या मॅनेजरला गाडीच्या चावीने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (६ एप्रिल) रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास उडपी लंच होम, खराळवाडी येथे घडली.
संत तुकारामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मॅनेजर राघवेंद्र सीताराम शेट्टी (वय ४५, खराळवाडी, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संकेत सकपाळ (वय २७, खराळवाडी, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संकेत सकपाळ याने सुरुवातीला हॉटेलमधील वेटरला शिवीगाळ केली. त्यानंतर, मॅनेजर शेट्टी यांनी त्याला जेवणाचे बिल मागितले असता, संकेतने रागाच्या भरात आपल्याजवळील ॲक्टिव्हा गाडीची चावी शेट्टी यांच्या मानेवर आणि डोक्यावर मारली. यामध्ये शेट्टी जखमी झाले आहेत.