शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: अनैतिक संबंध सोडत नाही; महिलेचा गळा आवळून खून, पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:27 IST

रखवालदार म्हणून काम करणाऱ्यचे अनैतिक संबंध नको होते, पण तरुणी त्याला सोडायला तयार नव्हती

पुणे : मूळ नेपाळचे असलेले दोघे एकमेकांचे नातेवाईक, दोघांचेही लग्न झालेले, दोघांनाही मुलबाळ झालेले असताना त्यांचे अनैतिक संबंध होते. रखवालदार म्हणून काम करणाऱ्याला आता हे अनैतिक संबंध नको होते, पण ती त्याला सोडायला तयार नव्हती. शेवटी त्याने टोकाचा निर्णय घेत तिला भिल्लारवाडीच्या जंगलात नेले. तिथे तिचा गळा आवळून खून केला. तब्बल १० दिवसांनी खुनाची घटना उघडकीस आली आहे.

मनीषा खम्म दमाई (वय २५, रा. आयुषी कॉम्लेक्स, पारे चौक, नऱ्हे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत किशन भरत परिहार (वय २५, रा. ओम शांती बिल्डिंग, मानाजीनगर, नऱ्हे) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, रा. हिंजवडी, मुळ रा. ढकारी, गाड पालिका, जि. अछाम, नेपाळ) याला अटक केली आहे. ही घटना मुंबई-बंगळुरू महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्याजवळील वाडा हॉटेलच्या मागील बाजूला जंगलामध्ये १८ ते २८ मार्च २०२६ दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश तिखात्री, मनीषा दमाई आणि किशन परिहार हे मूळचे नेपाळचे राहणारे असून गेल्या काही वर्षांपासून पुण्यात राहतात. खून झालेली मनीषा दमाई ही किशन परिहार यांची बहीण आहे. तर तिघेही एकाच समाजातील आहेत. प्रकाश तिखात्री व मनीषा दमाई यांचे विवाह झाले असून त्यांना मुलेही आहेत. त्यांचे अनैतिक संबंध होते. प्रकाश तिखात्री याला आता हे प्रेमसंबंध नको होते. परंतु, मनीषा हिला ते मान्य नव्हते. ती प्रेमसंबंध तोडण्यास नकार देत असल्याच्या रागातून १८ मार्च रोजी प्रकाश तिखात्री हा तिला घेऊन भिल्लारवाडी येथील जंगलात गेला. तेथे त्याने तिचा दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला.

मनीषा दमाई ही काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने तिचे नातेवाईक तिच्या मिसिंगची तक्रार देण्यास नऱ्हे पोलिस ठाण्यात गेले होते. हा प्रकार आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पोलिसांनी आंबेगाव पोलिसांकडे पाठवले. मनीषा हिच्या नातेवाइकांकडून आंबेगाव पोलिस माहिती घेत असताना प्रकाश तिखात्री याचे नाव समोर आले. पोलिसांनी प्रकाश तिखात्री याची आपल्या पद्धतीने चौकशी केली. तेव्हा त्याने तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक फिरोज मुलाणी यांनी मनीषा हिच्या नातेवाइकासह आरोपीला घेऊन भिल्लारवाडीच्या जंगलात नेले. तेथे प्रकाश तिखात्री याने घटनास्थळ दाखवले. किशन परिहार याने मनीषा हिचा मृतदेह ओळखला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर, वाघमारे आणि डोईफोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आंबेगाव पोलिसांनी प्रकाश तिखात्री याला अटक केली असून, एपीआय मुलाणी पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Jilted lover strangles woman after she ends relationship.

Web Summary : In Pune, a 25-year-old woman was murdered by her former lover after she ended their relationship. The accused strangled her with a rope near Katraj tunnel. Police arrested the suspect, who was originally from Nepal, and is being investigated.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याDeathमृत्यूDhankawadiधनकवडीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसkatrajकात्रज