शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय गुन्हेगारास अटक; ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेसह लोणावळा पोलिसांची कामगिरी

By नितीश गोवंडे | Updated: June 19, 2025 20:00 IST

चोरांनी त्यांच्या घरातून ४७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २ किलो वजनाची चांदीची भांडी असा २९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. फिर्यादी मुळे या २५ मे रोजी त्यांच्या मुलीकडे आंबेगाव बु. येथे आल्या होत्या.

पुणे : लोणावळा येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखेसह लोणावळा पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक करत त्यांच्या ताब्यातून ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चंद्रकांत अनंत माने उर्फ चंदू (३२, रा. चाफेकरनगर झोपडपट्टी, चिंचवड गाव), धनंजय हरीष काळे (२०, रा. भारतनगर झोपडपट्टी), दीपक शिवाजी मेंदगे (३८, रा. पाटील आळी, कर्जत) आणि कैलासचंद्र धगनलाल जाट (४०, रा. वाशी) अशी अटक करण्यात आलेल्या आंतरराज्यीय सराईतांची नावे आहेत. यातील चंद्रकांत उर्फ चंदू माने याच्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

लोणावळा पोलिस ठाण्यात ९ जून रोजी बिना नारायण मुळे (६५, रा. राजुजी कॉलनी, जुना खंडाळा रोड, लोणावळा) यांनी त्या घरात नसताना चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. चोरांनी त्यांच्या घरातून ४७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २ किलो वजनाची चांदीची भांडी असा २९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. फिर्यादी मुळे या २५ मे रोजी त्यांच्या मुलीकडे आंबेगाव बु. येथे आल्या होत्या. ९ जून रोजी लोणावळ्यातील त्यांच्या शेजाऱ्यांनी चोरी झाल्याची माहिती दिली. गुन्हा दाखल होताच ग्रामीण पोलिसांनी याबाबत तपासाला सुरूवात केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत या गुन्ह्यातील आरोपी हे लोणावळा स्टेशनकडे जाऊन रेल्वेने पिंपरी चिंचवड येथे गेल्याचे स्पष्ट झाले. गोपनीय बातमीदारांमार्फत या फुटेजमध्ये दिसणाऱ्या आरोपींपैकी चंदू माने हा चाफेकर नगर झोपडपट्टी येथे राहत असल्याचे पोलिसांना

समजले. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी चंदू माने आणि धनंजय काळे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत दीपक मेंदगे आणि कैलासचंद्र जाट यांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांना या दोघांना ताब्यात घेत अटक केली.

आरोपी चंदू माने याच्या हा चोरी करताना नेहमी वेगवेगळे साथीदार सोबत ठेवतो. त्याच्यावर कर्नाटक, चेन्नई, सोलापूर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर हद्दीत ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. १५ ते २० दिवसांपूवीच चंदू माने हा चेन्नई येथील घरफोडीच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेसह लोणावळा पोलिसांनी केली.

टॅग्स :PuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी