Pune Crime : सोसायटीमधील सात दुचाकी पेटवणारा सराईत अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:33 IST2025-06-12T11:33:05+5:302025-06-12T11:33:29+5:30

- या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने आरोपी सिद्धेश आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले.

Pune Crime: Innkeeper arrested for setting seven two-wheelers on fire in society | Pune Crime : सोसायटीमधील सात दुचाकी पेटवणारा सराईत अटकेत

Pune Crime : सोसायटीमधील सात दुचाकी पेटवणारा सराईत अटकेत

 पुणे : नऱ्हे भागातील एका सोसायटीच्या आवारातील सात दुचाकी पेटवून देऊन पसार झालेल्या सराइताला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धेश नितीन धुमाळ (२३, रा. घोरपडी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सिद्धेश हा सराईत गुन्हेगार आहे. त्याचा मित्र नऱ्हे भागातील सिद्धेश्वर प्लाझा या इमारतीत राहायला आहे. मित्र आणि तो बाहेर गेले होते. मंगळवारी रात्री सिद्धार्थने मित्राला घरी सोडण्यास सांगितले. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सिद्धेश आणि त्याचा अल्पवयीन साथीदार मध्यरात्री सोसायटीत आले. त्यांनी तळमजल्यावरील मित्राच्या दुचाकीवर पेट्रोल ओतून ती पेटवून दिली. शेजारी असलेल्या सहा दुचाकींनी पेट घेतला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने आरोपी सिद्धेश आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले.

पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रंगराव पवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पंढरीनाथ शिंदे, अतुल साठे, अमित बोडरे, कैलास लिम्हण, किशोर दुशिंग, महेंद्र तुपसौंदर आणि चेतन शिरोळकर यांनी ही कामगिरी केली.

Web Title: Pune Crime: Innkeeper arrested for setting seven two-wheelers on fire in society