Pune crime : पती, मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 12:04 IST2026-02-01T12:03:50+5:302026-02-01T12:04:32+5:30

- तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

pune crime Husband threatened to kill daughter, tortured woman | Pune crime : पती, मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर केला अत्याचार

Pune crime : पती, मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर केला अत्याचार

पुणे : पती व मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी २३ वर्षीय पीडितेने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुरू दोडमणी (२५), मयूर (२६) आणि दीपक काटकर (२४, सर्व रा. लिपाणे वस्ती, सद्गुरू हॉस्पिटलमागे, आंबेगाव खुर्द) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय पीडित महिला, तिचे पती व लहान मुलगी आंबेगाव परिसरात राहायला आहेत. आठ महिन्यांपूर्वी आरोपी दोडमणी महिलेचा पती घरात नसताना गेला. महिलेचा पती आणि मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या महिलेने या घटनेची माहिती कोणाला दिली नाही. त्यानंतर आरोपी दोडमणीने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला.

दोडमणीचे मित्र मयूर आणि दीपक यांनी महिलेच्या घरी गेले. तुझी बदनामी करेल, अशी धमकी आरोपींनी तिला दिली. महिलेच्या असहायतेचा फायदा घेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने अखेर आंबेगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघे आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title : पुणे: पति और बेटी को जान से मारने की धमकी देकर महिला से बलात्कार

Web Summary : पुणे में, एक महिला के पति और बेटी को जान से मारने की धमकी देकर उसके साथ बार-बार बलात्कार किया गया। तीन लोगों पर आरोप है, और पीड़िता द्वारा शिकायत दर्ज कराने के बाद पुलिस जांच कर रही है। आरोपी फिलहाल फरार हैं।

Web Title : Pune: Woman raped after threats to husband and daughter.

Web Summary : In Pune, a woman was repeatedly raped after threats were made against her husband and daughter. Three men are accused, and police are investigating after the victim filed a complaint. The accused are currently absconding.