Crime News: मुलीची ट्यूशन फी मागितल्याने पतीने पत्नीला केली लाकडी काठीने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 15:19 IST2026-04-12T15:16:04+5:302026-04-12T15:19:11+5:30
मुलीच्या ट्यूशनची फी भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने पतीने पत्नीला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले.

Crime News: मुलीची ट्यूशन फी मागितल्याने पतीने पत्नीला केली लाकडी काठीने मारहाण
पिंपरी : मुलीच्या ट्यूशनची फी भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने पतीने पत्नीला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना चऱ्होली बुद्रुक येथे बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. १० एप्रिल) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी फिर्यादीने पतीला मुलीच्या ट्यूशनची फी भरण्यास सांगितले. याचा राग येऊन पतीने फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादावादी दरम्यान त्याने लाकडी काठीने फिर्यादीच्या पाठीवर, तोंडावर आणि डोक्यावर मारहाण केली, ज्यामुळे फिर्यादीचे डोके फुटून रक्तस्राव झाला. यावेळी सासूनेही तिला चापटीने मारहाण करून घरातून हाकलून दिले.