हॉटेल युनिकॉर्न हाऊस सील; येरवडा पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 16:41 IST2025-04-13T16:40:21+5:302025-04-13T16:41:47+5:30
मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींमध्ये वाद व भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे.

हॉटेल युनिकॉर्न हाऊस सील; येरवडा पोलिसांची कारवाई
पुणे - येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेलिब्रम आयटी पार्क, कल्याण नगर येथे असलेल्या हॉटेल युनिकॉर्न हाऊस येथे 11 एप्रिलला मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींमध्ये वाद व भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी रात्री 1.45 च्या सुमारास हॉटेलची पाहणी केली असता हॉटेल बंद असून साफसफाई सुरू असल्याचे आढळून आले. मात्र, या वादासंदर्भात कोणत्याही व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.
यापूर्वीही या हॉटेलविरोधात दोन गुन्हे आणि 10 खटले दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 च्या कलम 142(2) अन्वये दिनांक 11 एप्रिल रोजी हॉटेल युनिकॉर्न हाऊस सील केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.