पुणे - शहरातील गजबजलेल्या एफ.सी. रोड परिसरात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. खाऊ गल्ली परिसरात एका व्यक्तीने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सातपुते (वय ४ १ ) असे जखमी व्यक्तीचे नाव असून ते मूळचे बोरिवली येथील रहिवासी आहेत. सध्या ते पुण्यातील भोसले नगर परिसरात वास्तव्यास होते.घटना कशी घडली?रविवारी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास, एफ.सी. रोडवरील खाऊ गल्लीत आदित्य सातपुते यांनी ब्लेडच्या सहाय्याने स्वतःच्या गळ्यावर वार केले. ही घटना अचानक घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. स्थानिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नोकरी गेल्याच्या नैराश्यातून सातपुते यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेनंतर त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अधिक माहिती गोळा केली जात आहे.
Web Summary : A Borivali resident, Aditya Satpute, attempted suicide on Pune's FC Road due to job loss frustration. He injured himself with a blade and is now receiving treatment in a private hospital. Police are investigating the incident.
Web Summary : पुणे के एफ.सी. रोड पर नौकरी छूटने से निराश होकर आदित्य सातपुते नामक व्यक्ति ने आत्महत्या का प्रयास किया। उन्होंने ब्लेड से खुद को घायल कर लिया और वर्तमान में एक निजी अस्पताल में उनका इलाज चल रहा है। पुलिस मामले की जांच कर रही है।