Pune Crime : शाळेत सोडतो म्हणाला अन्…; आईच्या मित्रानेच केला लेकीवर अत्याचार;गुन्हा दाखल
By किरण शिंदे | Updated: February 20, 2026 10:40 IST2026-02-20T10:40:05+5:302026-02-20T10:40:39+5:30
- मुलगी शाळेत पोहोचली की नाही याची माहिती घेत असताना ती शाळेत सात वाजताच्या ऐवजी साडेसात वाजता पोहोचली होती.

Pune Crime : शाळेत सोडतो म्हणाला अन्…; आईच्या मित्रानेच केला लेकीवर अत्याचार;गुन्हा दाखल
पुणे - पुण्यात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आलाय. मी तुला शाळेत सोडतो असं सांगून 13 वर्षीय मुलीवर गाडी लावून लैंगिक अत्याचार केलाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशनमध्ये आईने तक्रार दाखल केली असून वारजे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. ज्ञानेश्वर रायरीकर असं 29वर्षे आरोपीचे नाव आहे.
पीडित मुलीची आई विधवा आहे ती आणि ज्ञानेश्वर मागील अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत त्यामुळे दोघांमध्ये चांगली ओळख होती. आईचा ज्ञानेश्वर वर विश्वास होता आणि त्यामुळे मुलीला त्याच्यासोबत फिरण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे मुलीने शाळेत सोडण्यासाठी ज्ञानेश्वर याला बोलवलं आणि त्याने देखील मी शाळेत सोडतो म्हणून सांगून तिला डीपी रोडवर घेऊन गेला मात्र शाळेत न सोडताच गाडी डीपी रस्त्यावर थांबवली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
मुलगी शाळेत पोहोचली की नाही याची माहिती घेत असताना ती शाळेत सात वाजताच्या ऐवजी साडेसात वाजता पोहोचली होती. त्यानंतर मुलगी घरी आल्यावर आईने अर्धा तास का उशीर झाला याची माहिती मुलीला विचारली आणि त्या मुलीने घाबरत उत्तर दिली. यावरून तिच्या आईच्या संशय वाढला आणि आईने थेट पोलिसात तक्रार दाखल केली . आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्स अंतर्गत गुन्हा दाखल करणे केलाय आणि ज्ञानेश्वर रायरीकर याला अटक देखील केली आहे.