गावठी हातभट्टीवर छापा टाकत ३ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:44 IST2026-02-27T15:41:45+5:302026-02-27T15:44:13+5:30

या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

pune crime goods worth 3 lakh 59 thousand seized in raid on village hand kiln | गावठी हातभट्टीवर छापा टाकत ३ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

गावठी हातभट्टीवर छापा टाकत ३ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोमेश्वरनगर : निंबुत (ता. बारामती) येथील ओढ्यालगत सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

निंबुत गावच्या हद्दीतील लक्ष्मीनगर येथील रहिवासी प्रमोद प्रकाश नवले हा ओढ्यालगत गावठी हातभट्टी लावून दारू तयार करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांनी केलेल्या या पाहणीत घटनास्थळावरून ३ लोखंडी बॅरल मधील कच्चे रसायन, जमिनीतील खड्ड्यात साठवलेले रसायन, २ प्लास्टिक टाक्या, ३५ लिटर क्षमतेचे २४ कॅन गावठी दारू, ४ विद्युत मोटर पंप आणि इतर साहित्य असा एकूण ३,५९,००० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. 

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सपोनि नागनाथ पाटील, हवालदार पोपट नाळे, अनिल खेडकर, शुभांगी दणाने, अंमलदार आबा जाधव, नरेंद्र यादव, धनंजय भोसले, विकास येटाळे, प्रियांका झणझणे आणि चालक विजय शेंडकर यांचा समावेश होता.

Web Title : अवैध शराब भट्टी पर छापा, 3.59 लाख का माल जब्त।

Web Summary : बारामती के निंबुत में एक अवैध शराब भट्टी पर पुलिस ने छापा मारा, जिसमें कच्चा माल, शराब और उपकरण सहित ₹3.59 लाख का माल जब्त किया गया। इस कार्रवाई के बाद एक व्यक्ति के खिलाफ मामला दर्ज किया गया है।

Web Title : Illegal liquor den raided; goods worth ₹3.59 lakh seized.

Web Summary : Police raided an illegal liquor den in Nimbut, Baramati, seizing ₹3.59 lakh worth of materials, including raw materials, liquor, and equipment. An individual has been booked under relevant laws following the operation.