शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : पुण्यात मृत व्यक्तीच्या नावे मालमत्ता हडपणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 15:03 IST

Pune Crime - आरोपींनी संगनमत करून या मृत व्यक्तीच्या नावे बनावट आधारकार्ड, खरेदीखत आणि इतर शासकीय कागदपत्रे तयार केली.

लोहगाव :पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे जी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल अशी आहे. मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींची मालमत्ता हडपणाऱ्या एका सराईत टोळीचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी टोळीच्या मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे.

पुण्यातील येरवडा भागातील आगाखान पॅलेस समोरील सर्व्हे नंबर २१६२ मधील मोकळ्या जागेवर या टोळीची नजर होती. ही जागा दिवंगत ब्रिज किशन कोतरू यांच्या मालकीची होती. आरोपींनी संगनमत करून या मृत व्यक्तीच्या नावे बनावट आधारकार्ड, खरेदीखत आणि इतर शासकीय कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या मदतीने त्यांनी 'एस.के. ॲग्रोफूड टेक प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या मार्फत मालमत्ता हडपण्याचा कट रचला होता.

ही कामगिरी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त चिलुमुला रजनीकांत आणि साहाय्यक आयुक्त सुनील जैतापकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, पोलिस उपनिरीक्षक किशोर बेरड, शुभांगी चव्हाण आणि त्यांच्या पथकाने फत्ते केली. सध्या मुख्य आरोपी सुनील कदम याला २९ एप्रिल २०२६ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे, आणि या रॅकेटमध्ये अजून किती मालमत्ता हडपल्या गेल्या आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत.

असा झाला खुलासा -

या प्रकरणात मृत ब्रिज किशन कोतरू यांचे पुतणे अभिनव श्रीकिसन कोतरू (रा. दिल्ली) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार १८ फेब्रुवारी २०२६ रोजी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली. 

तपासात धक्कादायक माहिती समोर -

वजीर अजमुद्दीन शिकलगारला सातारा येथून ताब्यात घेण्यात आले. त्याने कबुली दिली की केवळ त्याला नाममात्र प्रमुख बनवण्यात आले होते. बाळकृष्ण लक्ष्मण दीक्षित (वय ७४) हा या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा दुवा ठरला. कसबा पेठेत राहणाऱ्या या ७४ वर्षीय वृद्धाने मृत ब्रिज किशन कोतरू यांचे रूपावर (सोंग) धारण केले होते. त्यानेच बनावट दस्तावेजांवर मृत व्यक्ती म्हणून सह्या केल्या होत्या. सुनील कदम उर्फ मिलिंद लक्ष्मण भुसारी (वय ६१) हा या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे. पोलिसांनी तब्बल ७४ तास पाळत ठेवून त्याला शिवाजीनगर परिसरातून अटक केली.

गुन्ह्याची कार्यपद्धती -

मुख्य आरोपी सुनील कदम हा शहरातील अशा मालमत्ता शोधायचा ज्या मृत व्यक्तींच्या नावावर आहेत आणि ज्यांना कोणी वारसदार नाही. त्यानंतर तो अशा गरीब, गरजू किंवा एकट्या राहणाऱ्या वृद्धांचा शोध घ्यायचा ज्यांचा चेहरा मृत व्यक्तीशी मिळताजुळता असेल. त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मृत व्यक्तीच्या नावे बनावट स्वाक्षऱ्या आणि अंगठे घेऊन मालमत्तेचे व्यवहार पूर्ण केले जात.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Crime: Gang Exposed for Seizing Property Using Dead Man's Name

Web Summary : Pune police busted a gang forging documents to seize property belonging to a deceased person. Three arrests were made, including the mastermind. The gang targeted properties with no clear heirs, exploiting look-alike elderly individuals for fraudulent transactions.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र