Pune Crime : सेंट्रल गव्हर्न्मेंट मध्ये नोकरी लावतो सांगून चार कोटीची फसवणूक
By नम्रता फडणीस | Updated: May 6, 2025 20:46 IST2025-05-06T20:45:58+5:302025-05-06T20:46:45+5:30
- आरोपीस खेड सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

Pune Crime : सेंट्रल गव्हर्न्मेंट मध्ये नोकरी लावतो सांगून चार कोटीची फसवणूक
पुणे : सेंट्रल गव्हर्न्मेंट मध्ये नोकरी लावतो असे सांगून चार कोटी रुपयांची फसवणूक करणा-या आरोपीस १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर राजगुरूनगर खेड येथील सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
सुभाष शिवदास भोसले असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या वतीने अँड नीलेश वाघमोडे अँड महेश देशमुख यांनी काम पाहिले त्यांना अँड श्रीकांत मोटे यांनी सहाय्य केले. याप्रकरणी आरोपीवर २०२४ मध्ये मंचर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपीने इन्कमटॅक्स डिपार्टमेंट, फूड कॉपरेशन ऑफ इंडिया , कस्टम डिपार्यमेंट मधे नोकरीला लावतो असे सांगून त्या बदल्यात जवळपास 36 लोकांकडून ४ कोटी ३७ लाख ३० हजार रुपये स्वीकारून कंपन्यांचे खोटे व बनावट नियुक्तीपत्र देउन तर काही कंपनीचे चे खोटे व बनावट ओळखपत्र देऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे.
आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की आरोपीची भूमिकी ही कायद्याच्या तरतुदीत बसत नसून, आरोपीने कोणत्याही प्रकारे जाणीव पूर्वक कोणतीही फसवणूक केलीली नाही व त्याच्या विरुद्ध तसा कोणताही प्रत्यक्ष दर्शनी पुरावा न्यायालयासमोर दाखल करण्यात आला नाही. आरोपीची या पूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीस जामीन मंजूर करण्यात आला.