Pune Crime : गजा मारणेच्या साथीदारांच्या चार कार जप्त

By नितीश गोवंडे | Updated: May 17, 2025 17:39 IST2025-05-17T17:38:57+5:302025-05-17T17:39:48+5:30

पुणे : येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात कुख्यात गुंड गजा मारणेला हलवण्यात येत असताना पोलिस व्हॅनच्या पाठीमागे असलेल्या मारणेच्या साथीदारांच्या ...

Pune Crime: Four cars of Gaja Marane accomplices seized | Pune Crime : गजा मारणेच्या साथीदारांच्या चार कार जप्त

Pune Crime : गजा मारणेच्या साथीदारांच्या चार कार जप्त

पुणे : येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात कुख्यात गुंड गजा मारणेला हलवण्यात येत असताना पोलिस व्हॅनच्या पाठीमागे असलेल्या मारणेच्या साथीदारांच्या चार महागड्या कार पोलिसांनी जप्त केल्या. गजा मारणे याची सातारा परिसरातील ढाब्यावर झालेल्या मटण पार्टी प्रकरणात मारणेच्या सांगलीतील साथीदाराला पोलिसांनी नुकतीच अटक केली, तसेच याप्रकरणात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील केले.

कोथरूड भागात संगणक अभियंत्याला भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याप्रकरणी मारणेसह सहा जणांविरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. याप्रकरणात यापूर्वी मारणेच्या दोन महागड्या कारसह चार कार जप्त केल्या होत्या. येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मारणेला सांगली कारागृहात हलवण्यात येत असताना व्हॅन सातारा परिसरातील एका ढाब्यावर थांबवण्यात आली. पोलिस व्हॅनबरोबर मारणेचे साथीदार कारमध्ये होते. ढाब्यावर थांबलेल्या व्हॅन जवळ कार आल्या.

 मारणेला साथीदारांनी व्हॅनमध्ये नेऊन बिर्याणी खाण्यास दिली. मारणेबरोबर बंदोबस्तास असलेल्या सहायक निरीक्षकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांनी ढाब्यावर जेवण केले. या प्रकाराची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाल्यानंतर त्यांनी चार पोलिसांना निलंबित केले. मारणेला बिर्याणी देणारे, तसेच त्याला भेटायला आलेले साथीदार पांडुरंग उर्फ पांड्या मोहितेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहिते याला गुन्हे शाखेने सांगलीतून नुकतीच अटक केली.

पोलिस व्हॅनचा मारणेच्या साथीदारांनी कारमधून पाठलाग केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सहा ते सात कार आढळून आल्या आहेत. याप्रकरणात चार कार जप्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित कार चालकांचा शोध घेण्यात येत आहे. कोथरूड मारहाण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी मारणेसह साथीदारांच्या आठ कार जप्त केल्या आहेत, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी सांगितले.

Web Title: Pune Crime: Four cars of Gaja Marane accomplices seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.