Pune Crime : कौटुंबिक वाद,मारहाण अन् ससूनमध्ये खोटं नाटक; पुण्यात तरुण महिलेचा खून,पती अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:53 IST2026-02-06T16:51:16+5:302026-02-06T16:53:08+5:30

- तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रुग्णालयातील डाॅक्टरांना त्याने खोटी माहिती दिली होती.

Pune Crime Family dispute, beating and false drama in Sassoon; Young woman murdered in Pune, husband arrested | Pune Crime : कौटुंबिक वाद,मारहाण अन् ससूनमध्ये खोटं नाटक; पुण्यात तरुण महिलेचा खून,पती अटकेत

Pune Crime : कौटुंबिक वाद,मारहाण अन् ससूनमध्ये खोटं नाटक; पुण्यात तरुण महिलेचा खून,पती अटकेत

पुणे : महिलेचा खून केल्याप्रकरणी खडक पोलिसांकडून पतीसह तिघांना अटक करण्यात आली. भवानी पेठेत ही घटना घडली होती. वैष्णवी उर्फ वर्षा तुषार तुपसौंदर्य (२३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी पती तुषार ऊर्फ गणेश विलास तुुपसौंदर्य (२८), मनोज रोहिदास कांबळे (३९), वनिता मनोज कांबळे (३२) यांना अटक करण्यात आली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक अनिता तोंडे यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, तुषार रिक्षाचालक आहे. २८ जानेवारी रोजी त्याच्या कौटुंबिक कारणावरून वैष्णवीशी वाद झाला होता, वैष्णवीला त्याने बेदम मारहाण केली होती. तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रुग्णालयातील डाॅक्टरांना त्याने खोटी माहिती दिली होती.

या घटनेनंतर तुषारने घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात पतीसह तिघांना अटक करण्यात आली. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तिघांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक शर्मिला सुतार करीत आहेत.

Web Title : पुणे: घरेलू विवाद के बाद महिला की हत्या; पति, सहयोगी गिरफ्तार

Web Summary : पुणे में घरेलू विवाद के बाद 23 वर्षीय महिला की हत्या कर दी गई। हत्या के आरोप में उसके पति और दो अन्य लोगों को गिरफ्तार किया गया है। पति ने शुरू में उसे अस्पताल में भर्ती कराया और गलत जानकारी दी। उसने सबूत नष्ट करने की भी कोशिश की।

Web Title : Pune: Woman Murdered After Domestic Dispute; Husband, Accomplices Arrested

Web Summary : A 23-year-old woman was murdered in Pune following a domestic dispute. Her husband and two others have been arrested for the crime. The husband initially took her to the hospital and provided false information. He also attempted to destroy evidence.