धायरी ( पुणे ) : धायरी परिसरातील प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक शाखेत बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेचे अधिकृत सुवर्ण मूल्यमापनकार आणि दोन कर्जदारांनी संगनमत करून तब्बल ७ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण उमाजी पाटील (सुवर्ण मूल्यमापनकार, रा. आंबेगाव पठार), गणेश बाबासाहेब आदलिंग (कर्जदार, रा. किरकटवाडी), शशिकांत संभाजी गोदगे (कर्जदार, रा. आंबेगाव पठार) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या वतीने मेघनाथ सदाशिव बोडस (वय ६३) यांनी नांदेड सिटी पोलिसांत तक्रार दिली.कसा उघड झाला घोटाळा?२८ मार्च ते २५ जून २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. २८ मार्च २०२५ रोजी शशिकांत गोदगे यांनी ७६.७६० ग्रॅम बनावट सोने तारण ठेवले. मूल्यमापनकाराने ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यावर ३.४४ लाख रुपये कर्ज मंजूर झाले. १८ जून २०२५ रोजी गणेश आदलिंग यांनी ८०.५०० ग्रॅम बनावट सोने ठेवले. पुन्हा व्हॅल्युअरने खरे असल्याचे सांगत ४ लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले.अशा प्रकारे १५७.२६० ग्रॅम बनावट सोने तारण ठेवून एकूण ७.४४ लाख रुपये कर्ज घेतले गेले. कर्जाची परतफेड न केल्याने बँकेला फसवणुकीचा संशय आला आणि चौकशीत घोटाळा उघडकीस आला. दरम्यान, नांदेड सिटी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डी. डी. सावंत तपास करत आहेत.
Web Summary : A fake gold mortgage scam at a Pune cooperative bank defrauded ₹7.44 lakhs. Three individuals, including a gold appraiser, are booked for fraud after suspicious loans were investigated due to non-repayment, revealing the use of fake gold.
Web Summary : पुणे के एक सहकारी बैंक में नकली सोना गिरवी रखकर ₹7.44 लाख की धोखाधड़ी की गई। गैर-पुनर्भुगतान के कारण संदिग्ध ऋणों की जांच के बाद, एक स्वर्ण मूल्यांकनकर्ता सहित तीन व्यक्तियों पर धोखाधड़ी का मामला दर्ज किया गया, जिसमें नकली सोने का उपयोग सामने आया।