पिस्तुलाचा धाक दाखवून पिता-पुत्राला जिवे मारण्याची धमकी; माजी सैनिक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:09 IST2025-05-28T10:08:49+5:302025-05-28T10:09:18+5:30
जेजुरीत तू माझ्या सगळ्यांसमोर अपमान केला. तू येथे बाहेरून पोट भरण्यासाठी आला आहे. तू येथे कसा राहतो हेच पाहतो,अशी धमकी दिली.

पिस्तुलाचा धाक दाखवून पिता-पुत्राला जिवे मारण्याची धमकी; माजी सैनिक अटकेत
पुणे : पुणे जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष दिलीप सोपान यादव व चिरंजीव विनय यादव यांनी लग्न सोहळ्यात आपल्याच पुतण्या व पुतणीवर पिस्टल रोखून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सासवड पोलिस स्टेशनमध्ये माजी राज्यमंत्री व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांची पुतणी केतकी धनंजय झेंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
सासवड पोलिस स्टेशनमध्ये दाखल फिर्यादीनुसार, शनिवारी (दि.२४) रोजी सासवड हडपसर रोडवरील महाराजा लॉन्समध्ये फिर्यादी झेंडे यांचे चुलत भाऊ प्रथमेश अजित यादव यांचा साखरपुडा होता. त्या कार्यक्रमाला सहकुटुंब हजर होते. यामध्ये दाजी सुनील धर्मराज कोलते, बहीण मलिनी कोलते, वहिनी सारिका यादव, नीलेश यादव, योगेश यादव असे सर्व नातेवाईक उपस्थित होते. याच कार्यक्रमात विनय यादव, दिलीप यादव, सुनीता यादव, शुभांगी दौंडकर, अक्षता यादव, भुजंग यादव, महेश यादव व इतर हेदेखील उपस्थित होते.
फिर्यादी केतकी झेंडे यांचे चुलत भाऊ चिनू उर्फ संकेत यादव हा झेंडे यांच्या परिवारातील सदस्यांना खिजविण्याच्या हेतूने जवळ येऊन तुम्ही शनिवारी (दि.१७ मे) ''माझ्या लग्नाला दिलीप यादव यांचे कारण देऊन आले नाही, मग आज या साखरपुड्यात कार्यक्रमाला कसे काय आले, यामुळे झेंडे यांचे दोन्ही भाऊ व चुलत भाऊ यांचा चिनू यादव यांच्याशी किरकोळ बाचाबाची झाली. त्यावेळी चुलत भाऊ चिनू हा या कुटुंबातील सदस्यांपासून निघून गेला आणि दिलीप सोपान यादव यांच्या कुटुंबीयांच्या घोळक्यामध्ये गेला.
काही मिनिटांत दिलीप सोपान यादव, विनय यादव, दिलीप यादव, सुनीता यादव, शुभांगी दौंडकर, अक्षता यादव, भुजंग यादव, महेश यादव व इतर झेंडे यांच्या भावांच्या अंगावर धावून आले. यातील अक्षता यादव, सुनीता यादव, शुभांगी दौंडकर यांनी दोन्ही भावांचे अंगावर जाऊन हाताने मारहाण केली. केतकी झेंडे मध्ये पडल्या असता दिलीप यादव व विनय यादव यांनी त्यांना जोरात ढकलून दिले. त्यामध्ये त्यांच्या गळ्यातील अंदाजे ३.३० ग्रॅम वजनाचा टेम्पल हार गहाळ झाला. याच दरम्यान दिलीप व विनय यादव यांनी कंबरेचे पिस्टल काढून झेंडे व त्यांच्या भावांच्या अंगावर ताणून त्यांना जिवे मारण्याची भीती घातली.
याआधी अदखलपात्र गुन्हा
याआधी देखील यादववाडी येथे झेंडे यांचे भाऊ प्रसाद यादव व सागर यादव गेले असता विनय व दिलीप यादव यांनी त्यांच्याकडील पिस्टल उगारून जिवे मारण्याची धमकी दिलेली होती. त्या अनुषंगाने सासवड पोलिस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे केतकी झेंडे यांनी फिार्यादित नमूद केले आहे.
परस्पर विरोधी तक्रार
फिर्यादी विनय दिलीप यादव यांच्या तक्रारीनुसार सागर बाळासाहेब यादव, प्रसाद बाळासाहेब यादव, सुनील धर्मराज कोलते (सर्व रा. सासवड) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी विनय यांचे वडील दिलीप, आई सुनीता, पत्नी अक्षता, मुलगा राजवीर व शिवतेज यांचेसह यादव कुटुंबीय व नातेवाईक, चुलत भाऊ प्रथमेश अजित यादव याचे साखरपुडा कार्यक्रमासाठी महाराजा लॉन्स सासवड येथे एकत्रित आलो होतो. आमच्या भावकीतील सागर बाळासाहेब यादव व प्रसाद बाळासाहेब यादव यांनी सन २०१५ साली माझे वडील दिलीप यादव यांना मारहाण केली होती. त्याबाबत सासवड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. तेंव्हापासून आमच्यात व त्यांच्यात पूर्ववैमनस्य आहे.
महाराजा लॉन्स येथे माझा भाऊ प्रथमेश अजित यादव याचा साखरपुडा समारंभ झाल्यानंतर घरी जाण्यासाठी मी, माझे वडील, आई, पत्नी व मुले तसेच बहीण शुभांगी संदीप दौंडकर यांचेसह घरी जाण्यासाठी महाराजा लॉन्सचे हॉलमधून बाहेर येत असताना हॉलचे मुख्य दरवाजाजवळ आलो असता आम्हाला आमचे भावकीतील सागर बाळासाहेब यादव, प्रसाद बाळासाहेब यादव व त्यांचे भाऊजी सुनील धर्मराज कोलते या तिघांनी पूर्ववैमनस्यातून राग मनात धरून अडविले व तुम्हाला सांगून पण तुम्ही सासवडला का येता, असे म्हणून सागर यादव याने माझे वडील दिलीप यादव यांना हाताने मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे.