घोडेगाव : आंबेगाव तालुका तहसील कार्यालय, घोडेगाव येथील अभिलेख कक्षामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुनील वसंत लोले (वय ३८, रा. जारकरवाडी, ता. आंबेगाव) यांच्याविरोधात घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल सहायक सचिन ओहळ यांनी याबाबत तक्रार दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी दिली.
दि. २५ रोजी दुपारच्या सुमारास आंबेगाव तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षामध्ये लोले हे दारूच्या नशेत येऊन ७/१२ उतारा व फेरफार तत्काळ देण्याची मागणी करत मोठमोठ्याने आरडाओरडा करत होते. यावेळी त्यांनी महसूल सहायक सचिन ओहळ तसेच इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली.
ओहळ यांना जिवे मारण्याची धमकी देत अभिलेख कक्षातील टेबलवरील कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून देत सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. सचिन ओहळ यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार लोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार हरिभाऊ नलावडे करीत आहेत.
Web Summary : A drunk man, Sunil Lole, disrupted the Ambegaon Tehsil office demanding documents and threatened officials. He verbally abused and threatened to kill a revenue assistant, Sachin Ohal, scattering papers, leading to his arrest. Police are investigating.
Web Summary : पुणे के आंबेगांव तहसील कार्यालय में सुनील लोले नामक एक नशे में धुत व्यक्ति ने दस्तावेजों की मांग करते हुए हंगामा किया और अधिकारियों को धमकी दी। उसने एक राजस्व सहायक, सचिन ओहल को जान से मारने की धमकी दी, जिसके बाद उसे गिरफ्तार कर लिया गया। पुलिस जांच कर रही है।