Pune Crime : शिरूरच्या बाबुरावनगरमध्ये ड्रग्सचा पर्दाफाश; गॅरेजचालक शादाब शेखकडून १ किलो मेफेड्रोन जप्त

By किरण शिंदे | Updated: January 20, 2026 12:34 IST2026-01-20T12:33:40+5:302026-01-20T12:34:11+5:30

आरोपी हा व्यवसायाने गॅरेज चालक असून, त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे.

Pune Crime Drugs busted in Baburao Nagar, Shirur 1 kg of mephedrone seized from garage driver Shadab Sheikh | Pune Crime : शिरूरच्या बाबुरावनगरमध्ये ड्रग्सचा पर्दाफाश; गॅरेजचालक शादाब शेखकडून १ किलो मेफेड्रोन जप्त

Pune Crime : शिरूरच्या बाबुरावनगरमध्ये ड्रग्सचा पर्दाफाश; गॅरेजचालक शादाब शेखकडून १ किलो मेफेड्रोन जप्त

पुणे - शिरूर शहरात अमली पदार्थविरोधी कारवाईत मोठे यश मिळाले असून, गॅरेज चालकाजवळ तब्बल २ कोटी १० लाख ४० हजार रुपये किमतीचे एक किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे शिरूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शादाब रियाज शेख (वय ४१, रा. डांबेनाला, शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा व्यवसायाने गॅरेज चालक असून, त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीकडे मेफेड्रोनसारखा घातक अमली पदार्थ असून तो विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस स्टेशन यांच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी मध्यरात्री संयुक्त कारवाई आखली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शादाब शेख हा शिरूरमधील बाबुराव नगर परिसरात दुचाकीवरून मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार किंमत सुमारे २ कोटी १० लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी आरोपीकडील अमली पदार्थ जप्त करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच हा अमली पदार्थ कुठून आणण्यात आला, यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title : पुणे: शिरूर में गैरेज मालिक 2.1 करोड़ रुपये के मेफेड्रोन के साथ गिरफ्तार

Web Summary : शिरूर पुलिस ने गैरेज मालिक शादाब शेख को 2.1 करोड़ रुपये के 1 किलो मेफेड्रोन के साथ गिरफ्तार किया। यह छापा बाबुराव नगर में ड्रग्स की बिक्री की सूचना के बाद मारा गया। पुलिस स्रोत और किसी बड़े नेटवर्क की जांच कर रही है।

Web Title : Pune: Shirur Garage Owner Nabbed with ₹2.1 Crore Worth Mephedrone

Web Summary : Shirur police arrested a garage owner, Shadab Sheikh, seizing 1 kg of mephedrone worth ₹2.1 crore. The raid followed a tip-off about drug sales in Baburao Nagar. Police are investigating the source and any larger network.