पुण्यात अमलीपदार्थांची तस्करी; ६ किलो गांजासह १६ लाखांचा माल केला हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:57 IST2025-06-26T17:56:04+5:302025-06-26T17:57:39+5:30

चौकशीत पोलिसांच्या विशेष पथकाने वेळापूर, पंढरपूर येथून त्याच्या साथीदारांना पकडले. त्यांच्याकडून गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली चारचाकी आणि मोबाइल असा १६ लाख ४६ हजारांचा माल जप्त केला आहे.

pune crime drug smuggling 6 kg of marijuana, worth 1.6 million seized | पुण्यात अमलीपदार्थांची तस्करी; ६ किलो गांजासह १६ लाखांचा माल केला हस्तगत

पुण्यात अमलीपदार्थांची तस्करी; ६ किलो गांजासह १६ लाखांचा माल केला हस्तगत

पुणे : स्वारगेट परिसरातून अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. चौकशीत पोलिसांच्या विशेष पथकाने वेळापूर, पंढरपूर येथून त्याच्या साथीदारांना पकडले. त्यांच्याकडून गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली चारचाकी आणि मोबाइल असा १६ लाख ४६ हजारांचा माल जप्त केला आहे.

नितीन नरसिंह पाल (२३, रा. वेळापूर, जि. सोलापूर) असे स्वारगेट बसस्थानकाजवळ पकडलेल्या तस्कराचे नाव आहे. तर अल्ताफ ईलाई तांबोळी (२८, रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि विठ्ठल ऊर्फ दादा हरी शिवपाल (३१, रा. आंबेडकरनगर, वेळापूर, ता. माळशिरस, सोलापूर) अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत.

सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या कार्यालयातील पोलिस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सावंत यांना बातमी मिळाली की, स्वारगेट बस स्टॅण्ड येथे संशयित तरुण बससाठी थांबला असून, त्याच्याकडे गांजासारखा अमलीपदार्थ आहे. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या बॅगेत गांजा मिळून आला. अधिक चौकशी केल्यावर त्याने अल्ताफ तांबोळी व विठ्ठल शिवपाल यांच्या मार्फत हा माल विक्रीसाठी पुण्यात घेऊन आल्याचे सांगितले.

सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांनी नेमलेल्या विशेष पथकातील पोलिस निरीक्षक संपतराव राऊत, पोलिस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सावंत, फिरोज शेख आणि सुजय पवार यांनी वेळापूर या भागात आरोपींच्या मोबाइलच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे दोघा आरोपींचा शोध घेऊन पकडले. या कारवाईत १ लाख २१ हजार रुपयांचा ६ किलो गांजा, १५ लाखांची इनोव्हा क्रिस्टा कार, २५ हजारांचे ३ मोबाइल असा १६ लाख ४६ हजार रुपयांचा माल जप्त केला.

Web Title: pune crime drug smuggling 6 kg of marijuana, worth 1.6 million seized