अंमली पदार्थ देऊन जिवे मारण्याचे षडयंत्र, पुजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 16:30 IST2026-01-20T16:26:28+5:302026-01-20T16:30:12+5:30

- या घटनेमागे कोणाचा हात आहे, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.  

pune crime conspiracy to kill by giving drugs, allegation by Puja Khedkar father Dilip Khedkar | अंमली पदार्थ देऊन जिवे मारण्याचे षडयंत्र, पुजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचा आरोप

अंमली पदार्थ देऊन जिवे मारण्याचे षडयंत्र, पुजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचा आरोप

पुणे : आमच्या घरी झालेली चोरी हा एक बनाव असून त्यामागे आमच्या कुटुंबाला जिवे मारण्याचा उद्देश होता. या घटनेचा पोलिसांकडून तपास जाणीवपूर्वक हलगर्जीपणाने होत असल्याचा आरोप वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पुजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांनी केला आहे. या घटनेमागे कोणाचा हात आहे, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

गेल्या आठवड्यात पुजा खेडकर हिच्या औंध येथील नॅशनल हौसिंग सोसायटीतील बंगल्यामध्ये दरोड्याची घटना घडली होती. खेडकर कुटुंबीय, नोकर यांना बेशुद्ध करून चोरी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर दिलीप खेडकर यांनी पत्रकार परिषद माहिती दिली. ते म्हणाले, “ही घटना केवळ चोरीपुरती मर्यादित नसून त्यामागे खेडकर कुटुंबियांना जिवे मारण्याचा उद्देश असल्याचा आरोप केला. या मागे मोठे षडयंत्र असून पोलिस तपासात हलगर्जीपणा करत आहेत. याबाबत चोराची सर्व माहिती देऊनही त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही. हा चोर घरात एक महिन्यापूर्वी एका नामांकित कंपनीकडून भाडेतत्वावर कामावर ठेवण्यात आला होता. या घटनेत ७ जणांनी शस्त्रांसह घरात प्रवेश केला. तर बाहेरही सुमारे तितकेच लोक होते. त्यांनी जेवणातून अंमली पदार्थ देऊन सर्वांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हे अंमली पदार्थ दुर्मिळ असून त्याच्या प्रयोगामुळे सर्व कुटुंबिय पाच दिवस व्हेंटिलेटवर होते. त्यावर उपचार करणेही कठीण झाले होते.”

चोरी करताना अनेक मौल्यवान वस्तू घरात असुनही त्याला या चोरट्यांनी हात लावला नाही. केवळ अंमली पदार्थांचा वापर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मुलगी डॉक्टर असल्याने तिला ही बाब लवकर समजली त्यामुळे आमचा जीव वाचला असेही ते म्हणाले. या प्रकरणात तपास संथ गतीने सुरू असून पोलिस माहिती देत नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वीच्या प्रकरणात मात्र, त्यांनी कायद्याचा गैरवापर करत आमच्या कुटुंबियांना त्रास दिल्याचे ते म्हणाले. राजकीय आणि समाजकार्य करत असतानाच असे त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. 

Web Title : पूजा खेडकर के पिता का आरोप, परिवार को जहर देकर मारने की साजिश।

Web Summary : दिलीप खेडकर ने आरोप लगाया कि चोरी एक नाटक था, जिसका मकसद परिवार को जहर देकर मारना था। उन्होंने पुलिस पर लापरवाही का आरोप लगाया और घटना की गहन जांच की मांग की, जिसमें उनके परिवार को नशीला पदार्थ दिया गया और कीमती सामानों को अनदेखा कर दिया गया।

Web Title : Puja Khedkar's father alleges plot to kill family with drugs.

Web Summary : Dilip Khedkar claims a staged robbery aimed to kill his family using narcotics. He accuses police of negligence, demanding a thorough investigation into the incident where his family was drugged and valuables were ignored.