पुणे - पुण्यात गुन्हेगारी प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एका महिलेनं तरुणावर अत्याचार केल्याच्या प्रकरण उघडीस आला आहे. या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील महिलेवर नाते संबंध असल्याचे सांगत जवळीक साधून खंडणी मागितल्या आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका 47 वर्षीय व्यक्तीने पुण्यातील एका महिलेवर (वय 42) मैत्री व नातेवाईकांच्या बहाण्याने जवळीक साधून खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. घटनाक्रम गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. 7 नोव्हेंबर 2024 रोजी तुळजापूर येथे कुटुंबासह दर्शनासाठी गेल्यानंतर त्यांची आणि सोबतच्या या महिलेची ओळख झाली. त्यानंतर महिलेने “तुम्हाला भाऊ मानते” असे सांगत त्यांच्या पत्नीशी संपर्क साधला आणि वारंवार त्यांच्या घरी जाऊन राहू लागली. स्वतःला “हायकोर्टात वकिलीची प्रॅक्टिस” असल्याचे सांगून मोठ्या लोकांची ओळख असल्याचा दावा करत कुटुंबातील कामे करून देण्याचे आश्वासनही दिले.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1345752000368499/}}}}त्यानंतर विविध कारणांनी तिने तक्रारदाराला बेळगाव, चंदगड, पुणे आणि काशी–विश्वनाथ येथे नेण्यास भाग पाडले, अशीही तक्रार आहे. काशी येथे तीन दिवस जबरदस्तीने थांबवून मानसिक दडपण आणल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. पुण्यात परतल्यानंतर तिने सोन्याची अंगठी खरेदी करून देण्यास भाग पाडले तसेच “लग्न कर” किंवा “दोन लाख रुपये दे” अशा धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदार कसाबसा सुटका करून तक्रारदार गावी गेले. पत्नीने संबंधित महिलेला फोनवर सुनावल्यावर काही दिवस संपर्क बंद राहिला; मात्र नंतर विविध नंबरवरून फोन करून “दोन लाख रुपये दे नाहीतर फोटो व्हायरल करेन. मी असे अनेकांना फसवले आहे” अशा धमक्या देण्यात आल्याचा आरोप आहे.तक्रारदाराच्या पत्नीला फोन करून शिवीगाळ करणे, फोटो व्हायरल करण्याची धमकी देणे आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून आर्थिक मागणी करणे असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेनेही तक्रारदाराविरुद्ध स्वतंत्र तक्रार दिल्याचे समजते. या सर्व प्रकारामुळे तक्रारदाराने पुण्यातील महिलेविरुद्ध खंडणीसह अन्य गुन्ह्यांचा लिखित अर्ज पोलीस ठाण्यात दिला असून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : A Kolhapur man accuses a Pune woman of extortion after she befriended his family, falsely claimed to be a lawyer, and demanded money or threatened to release compromising photos. Police are investigating the case.
Web Summary : कोल्हापुर के एक व्यक्ति ने पुणे की एक महिला पर उगाही का आरोप लगाया है, जिसने उसके परिवार से दोस्ती की, झूठा दावा किया कि वह वकील है, और पैसे की मांग की या समझौतावादी तस्वीरें जारी करने की धमकी दी। पुलिस मामले की जांच कर रही है।