माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये,नाही तर..; गरोदर विवाहितेचा छळ;पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:01 IST2026-04-08T17:01:20+5:302026-04-08T17:01:36+5:30

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आळंदी पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

pune crime Bring 2 lakh rupees from Maher, otherwise Pregnant married woman harassed; Case registered against four including husband in Alandi | माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये,नाही तर..; गरोदर विवाहितेचा छळ;पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये,नाही तर..; गरोदर विवाहितेचा छळ;पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

आळंदी : कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये, अन्यथा नांदवणार नाही, असे म्हणत एका २९ वर्षीय गरोदर विवाहितेला लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आळंदी पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनघा सागर सुरवसे (वय २९) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती सागर अनिल सुरवसे (वय ३०), सासरे अनिल प्रेमनाथ सुरवसे (वय ६०), सासू मंगल अनिल सुरवसे (वय ४९) आणि नणंद भाग्यश्री आतिश गोतारणे (वय ३२, सर्व रा.इंद्रायणी पार्क, वडगाव रस्ता, आळंदी देवाची) यांच्यावर कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : दहेज के लिए गर्भवती महिला को प्रताड़ित किया; पति, ससुराल वाले गिरफ्तार।

Web Summary : आलंदी में एक गर्भवती महिला को दहेज के लिए प्रताड़ित किया गया और पीटा गया। उसके पति और ससुराल वालों ने ₹2 लाख की मांग की। पुलिस ने चार लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Pregnant woman harassed for dowry; husband, in-laws booked in Alandi.

Web Summary : A pregnant woman in Alandi was harassed and beaten for dowry. Her husband and in-laws demanded ₹2 lakh. Police have registered a case against four.