Pune Crime: पुण्यात एका २४ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. शहरातील मुंढवा परिसरात त्याच्यावर दुसऱ्या तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याला आधी बेदम मारहाण केली आणि नंतर धारदार शस्त्रांनी वार करत जखमी केले. पोलिसांनी त्याला वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले. हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या चार साथीदारांचा शोध घेत आहेत.
प्रवीण धनंजय माने (वय २४, रा. शेवाळवाडी) असे प्राणघातक हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रवीण माने हा पुण्यात एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहे. त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्याच तरुणीच्या प्रकरणावरून हा वाद झाला.
आरोपी महेश सरोदे (वय ३५) याचा प्रवीणचे त्या तरुणीसोबत असलेल्या संबंधांना विरोध होता. तो वारंवार प्रविणला धमक्या देत होता. त्या तरुणीसोबतचे संबंध तोड, असे महेश सरोदे प्रवीणला म्हणत होता. पण, प्रविणने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
भेटण्यासाठी बोलावले आणि...
सांगितलेलं ऐकत नसल्याने महेशने प्रवीणला तुझ्याशी चर्चा करायची आहे, असे म्हणत बोलावून घेतलं. प्रवीण त्याला भेटण्यासाठी मुंढव्यात पोहोचला. तिथे आरोपी महेश सरोदे आणि त्याचे चार साथीदार होते. त्या पाच जणांनी त्याला घेरले.
सुरूवातीला पाच जणांनी प्रवीण लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. नंतर आरोपी महेशने प्रवीणवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यामुळे जखमी होऊन प्रवीण खाली कोसळला. आमच्याबद्दल पोलिसांना काही सांगू नको, अशी धमकी देत आरोपी तिथून पळून गेले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता प्रवीण
दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवीणला उचलले आणि तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर पोलिसांनी आरोपी महेश आणि त्याच्या साथीदारांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी महेश सरोदे याला अटक केली. सध्या प्रवीणवर हल्ला करणाऱ्या इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
Web Summary : A Pune youth was brutally attacked for refusing to end a relationship. Mahesh Sarode, the accused, repeatedly threatened the victim, Praveen Mane. Sarode and his accomplices assaulted Mane with weapons, leaving him critically injured. Police arrested Sarode and are searching for his accomplices.
Web Summary : पुणे में एक युवक पर प्रेम संबंध खत्म करने से इनकार करने पर बेरहमी से हमला किया गया। आरोपी महेश सरोदे ने पीड़ित प्रवीण माने को बार-बार धमकी दी। सरोदे और उसके साथियों ने माने पर हथियारों से हमला कर गंभीर रूप से घायल कर दिया। पुलिस ने सरोदे को गिरफ्तार कर लिया है और उसके साथियों की तलाश कर रही है।