Ayush Komkar : आरोपींच्या बँक खात्यातून आणखी ५० लाख जप्त; पोलिसांचा तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:26 IST2025-09-19T20:25:01+5:302025-09-19T20:26:46+5:30

पोलिसांकडून आंदेकर टोळीच्या सर्व सदस्यांच्या मालमत्तेची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास सुरु करण्यात आला

pune crime ayush komkar Another Rs 50 lakh seized from the accused's bank account; Police investigation underway | Ayush Komkar : आरोपींच्या बँक खात्यातून आणखी ५० लाख जप्त; पोलिसांचा तपास सुरु

Ayush Komkar : आरोपींच्या बँक खात्यातून आणखी ५० लाख जप्त; पोलिसांचा तपास सुरु

पुणे: नाना पेठेतील आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरच्या घरावर काही दिवसांपूर्वी छापा टाकल्यानंतर आता पोलिसांनी इतर आरोपींच्या बँक खात्यांवरही कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ५० लाख रुपये जप्त करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण २७ बँक खाती फ्रीज करण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये  तब्बल ५० लाख ६६ हजार १९९ रुपये गोठवले गेले आहेत.

दरम्यान, पोलिसांकडून आंदेकर टोळीच्या सर्व सदस्यांच्या मालमत्तेची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास सुरु करण्यात आला आहे. यापूर्वी १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता सुरू झालेली आणि ११ सप्टेंबरला पहाटे ४ वाजेपर्यंत चाललेली बंडू आंदेकरच्या घराची झडती मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. या झडतीत पोलिसांच्या हाती ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ८५ लाख रुपये), ३१ हजारांची चांदी, २ लाख ४५ हजारांची रोकड, तसेच विविध कागदपत्रे मिळाली. यावेळी गुन्हे शाखा आणि समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. 



विशेष म्हणजे, बंडू आंदेकरने घराच्या आसपास तब्बल २५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचे पोलिस तपासात समोर आले. ५ सप्टेंबर रोजी बंडू आंदेकरचा नातू आयुष कोमकर (कल्याणी आंदेकरचा मुलगा) याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या खुनानंतर पोलिसांनी बंडू आंदेकरसह त्याच्या टोळीतील सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

तपासाचा भाग म्हणून बुधवारी पोलिसांनी बंडू आंदेकर, अमन पठाण, यश पाटील आणि वाडेकर कुटुंबीय (वृंदावनी, स्वराज व तुषार) यांच्या घरांची झडती घेतली. या झडतीत २१ हजारांची रोकड, १६ मोबाईल, दागिन्यांच्या पावत्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. पोलिस तपासामुळे आंदेकर टोळीच्या बेकायदेशीर संपत्तीचे जाळे उघडकीस येत असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. 

Web Title: pune crime ayush komkar Another Rs 50 lakh seized from the accused's bank account; Police investigation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.