Pune crime : फोन न उचलल्याने पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:33 IST2025-11-16T15:32:39+5:302025-11-16T15:33:44+5:30
संतोष आणि फिर्यादी राजश्री हे पती-पत्नी आहेत. संतोष याने पत्नी राजश्री यांना फोन केला. मात्र, राजश्री यांनी तो फोन उचलला नाही.

Pune crime : फोन न उचलल्याने पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी : पतीने फोन केल्यानंतर पत्नीने फोन उचलला नाही. या कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. १२) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथे घडली.
राजश्री संतोष बिसनाळ (वय ३४, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी शुक्रवारी (दि. १४) याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष नागप्पा बिसनाळ (वय ४४) याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि फिर्यादी राजश्री हे पती-पत्नी आहेत. संतोष याने पत्नी राजश्री यांना फोन केला. मात्र, राजश्री यांनी तो फोन उचलला नाही. या कारणावरून त्याने घरी आल्यावर पत्नी राजश्री यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सेफ्टी शूजने त्यांच्या पोटावर मारले. तसेच गळ्यावर पाय ठेवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.