शाळेतील काम सोडल्याचा राग,महिलेला मारहाण करून केला अत्याचार;गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:39 IST2025-07-15T11:38:50+5:302025-07-15T11:39:04+5:30
- दोघांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

शाळेतील काम सोडल्याचा राग,महिलेला मारहाण करून केला अत्याचार;गुन्हा दाखल
पुणे : शाळेतील नोकरी सोडल्याचा राग मनात धरून दोघांनी महिलेसोबत लज्जास्पद वर्तन करून शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी दोघांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २८ वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चैतन्य गुलाब लांडगे (३६, रा. लोणी काळभोर) आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरी येथे शनिवारी (दि. १२) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य लांडगे याची मांजरीत शिक्षण संस्था आहे. तो या संस्थेचा अध्यक्ष आहे. त्याच्या शाळेतील एका महिलेने काम सोडले आहे. त्याचा राग मनात धरून फिर्यादी महिला घरी जात असताना दोघांनी तिचा पाठलाग केला. महिलेच्या घरासमोर शिवीगाळ करून चैतन्य लांडगे याने अश्लील बोलून आपल्याकडे ओढले. त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन केले. हाताने गालावर व डोळ्याजवळ मारहाण करून जखमी केले. काही मुलांना बालावून तुम्हाला जीवे मारतो, अशी धमकी दिल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डिगोळे करत आहेत.