Pune Crime : चेष्टा-मस्करीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’? व्हिडिओ व्हायरल होताच अमन मुल्ला अटकेत

By किरण शिंदे | Updated: March 10, 2026 13:23 IST2026-03-10T13:16:29+5:302026-03-10T13:23:38+5:30

- अमन मुल्ला याचा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Pune Crime Aman Mulla arrested after video goes viral for jokingly saying 'Pakistan Zindabad' | Pune Crime : चेष्टा-मस्करीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’? व्हिडिओ व्हायरल होताच अमन मुल्ला अटकेत

Pune Crime : चेष्टा-मस्करीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’? व्हिडिओ व्हायरल होताच अमन मुल्ला अटकेत

पुणे - चेष्टा-मस्करीतून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. अमन मुल्ला असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो फॅब्रिकेशनचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमन मुल्ला याचा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याबाबत पोलिसांकडे तक्रारी येऊ लागल्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत संबंधित तरुणाचा शोध घेतला. 

तपासादरम्यान पोलिसांनी अमन मुल्ला याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याविरोधात पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीदरम्यान अमन मुल्ला याने आपण चेष्टा-मस्करीतून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र घोषणा देण्यामागचे खरे कारण काय आहे? हा व्हिडिओ कोणी चित्र केला याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली. 

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमन मुल्ला याला आपल्या कृत्याची जाणीव झाली आणि त्याने झाल्या प्रकाराबद्दल माफी ही मागितली. मात्र देशविरोधी घोषणांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title : पुणे: 'पाकिस्तान जिंदाबाद' का नारा लगाने पर युवक गिरफ्तार।

Web Summary : पुणे में 'पाकिस्तान जिंदाबाद' का नारा लगाने का वीडियो वायरल होने के बाद 20 वर्षीय युवक को गिरफ्तार किया गया। पुलिस मामले की जांच कर रही है। आरोपी ने माफी मांगी है, लेकिन पुलिस ने सख्त कार्रवाई की है।

Web Title : Pune: Man arrested for shouting 'Pakistan Zindabad' in jest.

Web Summary : A 20-year-old man was arrested in Pune after a video of him jokingly shouting 'Pakistan Zindabad' went viral. Police are investigating the motive and who filmed the video. He has apologized, but police have taken strict action.