ऐन गुढीपाडव्याला सोडतापवाडी फाट्यावर अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 16:53 IST2025-03-30T16:52:51+5:302025-03-30T16:53:40+5:30

उरळीकांचन - गुढीपाडव्याच्या दिवशी सोडतापवाडी फाट्यावर एका मोठ्या बलकरचा भीषण अपघात झाला. हडपसरहून उरळीकांचनच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण ...

pune crime Accident at Sodtapwadi junction on Gudi Padwa, fortunately no loss of life | ऐन गुढीपाडव्याला सोडतापवाडी फाट्यावर अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

ऐन गुढीपाडव्याला सोडतापवाडी फाट्यावर अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

उरळीकांचन - गुढीपाडव्याच्या दिवशी सोडतापवाडी फाट्यावर एका मोठ्या बलकरचा भीषण अपघात झाला. हडपसरहून उरळीकांचनच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बलकर सरळ एका चारचाकी गॅरेजवर जाऊन चढला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या मारुती एर्टिगा आणि अन्य दोन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  



अपघात आज  दुपारी तीनच्या सुमारास घडला. अचानक झालेल्या या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच उरळीकांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: pune crime Accident at Sodtapwadi junction on Gudi Padwa, fortunately no loss of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.