Pune Crime : पोलिस हवालदाराने २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 11:55 IST2026-02-01T11:55:34+5:302026-02-01T11:55:49+5:30

तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला.

Pune Crime ACB takes action against police constable for demanding bribe of Rs 25,000 | Pune Crime : पोलिस हवालदाराने २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीची कारवाई

Pune Crime : पोलिस हवालदाराने २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीची कारवाई

पुणे : दाखल गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस हवालदाराने २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार रमेश लक्ष्मण नागटिळक (४२) असे लाचखोर हवालदाराचे नाव असून, त्याने २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे एसीबीने केलेल्या तपासात निष्पन्न झाले. ही कारवाई शनिवारी (दि. ३१) करण्यात आली.

तक्रारदार महिलेच्या मुलाविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या प्रकरणात जामिनासाठी मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्याचे चार्जशीट लवकर न्यायालयात दाखल करण्यासाठी पोलिस हवालदार नागटिळक याने सुरुवातीला ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. 

यानंतर तक्रारदाराने १८ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. त्यानंतर शनिवारी पोलिस हवालदार रमेश नागटिळक याने पैसे मागितल्याचे निष्पन्न होताच एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : पुणे: 25,000 रुपये रिश्वत मांगने पर पुलिस कांस्टेबल गिरफ्तार

Web Summary : पुणे में एक पुलिस कांस्टेबल को आरोपी को जमानत दिलाने और चार्जशीट दाखिल करने में तेजी लाने के लिए ₹25,000 की रिश्वत मांगने के आरोप में गिरफ्तार किया गया। शिकायत दर्ज होने के बाद भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो (एसीबी) ने जाल बिछाकर कांस्टेबल को गिरफ्तार कर लिया और भ्रष्टाचार निवारण अधिनियम के तहत आरोप लगाए।

Web Title : Pune: Police Constable Arrested for Demanding ₹25,000 Bribe

Web Summary : A Pune police constable was arrested for demanding ₹25,000 to help an accused get bail and expedite the charge sheet filing. The Anti-Corruption Bureau (ACB) laid a trap after a complaint was filed, leading to the constable's arrest and charges under the Prevention of Corruption Act.