Pune Crime : रामनवमी मिरवणुकीतील भांडणावरून टोळक्याने रिक्षाचालकावर तीक्ष्ण हत्याराने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 18:15 IST2026-03-27T18:14:58+5:302026-03-27T18:15:18+5:30

- मुंढवा पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

Pune Crime A gang attacked a rickshaw driver with a sharp weapon over a fight during a Ram Navami procession. | Pune Crime : रामनवमी मिरवणुकीतील भांडणावरून टोळक्याने रिक्षाचालकावर तीक्ष्ण हत्याराने केले वार

Pune Crime : रामनवमी मिरवणुकीतील भांडणावरून टोळक्याने रिक्षाचालकावर तीक्ष्ण हत्याराने केले वार

पुणे : रामनवमी मिरवणुकीत झालेल्या भांडणाच्या कारणावरून बी.टी. कवडे रोड येथे टोळक्याने रिक्षाचालक तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंढवा पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अक्षय आनंद गवळी (३०, रा. कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

त्याचा भाऊ अजिंक्य आनंद गवळी (२७, रा. शक्तीनगर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी) यांने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी काशीराम मोघे (३०), अभिषेक मोघे (२७) आणि नंदू नवनाथ थोरात (२९, तिघे रा. बी. टी. कवडे रोड, घोरपडी) व त्यांच्या इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हडपसर रेल्वे स्टेशन रोडवरील जाधव वस्तीजवळ गुरुवारी (दि. २६) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजिंक्य गवळी हे रिक्षाचालक असून, त्यांचा मोठा भाऊ अक्षय गवळी हाही रिक्षाचालक आहे. अक्षय गवळी हा रामनवमीनिमित्त कात्रजहून घोरपडी येथील फिर्यादीच्या घरी आला होता. त्यानंतर तो एका मिरवणुकीत सहभागी झाला.

मिरवणुकीत कोणाचेही फोटो किंवा बॅनर न लावण्याबाबत ठरले होते. परंतु, मिरवणुकीमध्ये एकाचा बॅनर लावलेला दिसून आला. त्यामुळे त्याला मिरवणुकीमध्ये इतर लोकांनी तसेच फिर्यादी यांनी विरोध केला होता. त्यामुळे रात्री साडेआठच्या सुमारास नंदू थोरात याने तुम्हाला लय माज आला का रे, असे म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादी यांच्या गालावर चापट मारली. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. काशीराम मोघे व इतरांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तेव्हा जमलेल्या लोकांनी त्यांची भांडणे मिटवली.

मिरवणूक संपल्यानंतर अजिंक्य गवळी व त्याचे मित्र अमित परदेशी हा मांजरी येथील झेड कॉर्नरला राहत असल्याने त्याला सोडवण्यासाठी अक्षय गवळी, विनायक म्हेत्रे व विनायकचा कामगार हे दुचाकीवरून जात होते.

ताडीगुत्ता चौक येथे सिग्नलला असताना काशीराम मोघे, नंदू थोरात यांनी पाहिले. त्यांनी अक्षयला शिवीगाळ केली. तेव्हा ते तेथून घाबरून हडपसर रेल्वे स्टेशनवरून जात असताना रात्री अकराच्या सुमारास त्यांनी जाधव वस्ती येथे अडवले. रामनवमी मिरवणुकीत झालेल्या भांडणावरून त्यांनी तुम्हाला लय माज आला आहे, असे म्हणून काशीराम मोघे व अभिषेक मोघे यांनी हातातील धारदार हत्याराने अक्षय गवळी याच्या डोक्यात, पोटावर, पायावर व हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्याला सोडवण्यासाठी जात असताना नंदू थोरात व इतर तिघांनी अमित परदेशी, विनायक म्हेत्रे व त्यांच्या कामगार यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. अक्षय गंभीर जखमी झाल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक पुढील तपास करत आहेत.

Web Title : पुणे: रामनवमी जुलूस विवाद में गिरोह ने रिक्शा चालक पर हमला किया।

Web Summary : पुणे में रामनवमी जुलूस के दौरान विवाद के कारण एक गिरोह ने रिक्शा चालक पर हमला कर दिया, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गया। हडपसर रेलवे स्टेशन के पास हुई घटना के बाद पुलिस ने दो संदिग्धों को गिरफ्तार किया है। पीड़ित अस्पताल में भर्ती है; जांच जारी है।

Web Title : Pune: Gang attacks rickshaw driver over Ram Navami procession dispute.

Web Summary : A rickshaw driver was severely injured in Pune after being attacked by a gang due to a dispute during a Ram Navami procession. Police have arrested two suspects following the incident near Hadapsar railway station. The victim is hospitalized; an investigation is underway.