येरवड्यात मध्यरात्री घरावर कोयत्याने केले वार; सीसीटीव्ही फुटेज आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:00 IST2025-04-02T16:59:15+5:302025-04-02T17:00:30+5:30
गेल्या काही दिवसांत पुण्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

येरवड्यात मध्यरात्री घरावर कोयत्याने केले वार; सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- किरण शिंदे
पुणे - शहरात गुन्हेगारी घटना वाढताना दिसत आहे. पुन्हा एकदा कोयत्याचा धाक नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करत आहे. मंगळवारी मध्यरात्री येरवड्यातील कामराजनगर येथे अज्ञात व्यक्तींनी चोरीच्या उद्देशाने अनेक घरांवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. यादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सोशल मीडियावर हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये अज्ञात आरोपीने चेहऱ्याला ओढणीने बांधून हातात कोयता घेऊन कामराजनगर परिसरातील घरच्या दारावर कोयत्याने वार केले आहे. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येरवड्यात मध्यरात्री घरावर कोयत्याने केले वार; सीसीटीव्ही फुटेज आले समोर#Pune#yerwada#Police#crimepic.twitter.com/FbIhyRRnvr
— Lokmat (@lokmat) April 2, 2025
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. आरोपीने चोरीच्या उद्देशाने कोयता घेऊन घरावर वार केला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत पुण्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीच्या गस्तीतही वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.