Pune: अंगावर काटा आणणारी घटना..! पुण्यात १५ वर्षीय मुलीची घरातच प्रसूती; नाळही स्वतः कापली, आरोपी अटकेत

By किरण शिंदे | Updated: February 10, 2026 12:13 IST2026-02-08T16:32:40+5:302026-02-10T12:13:57+5:30

Pune Minor Girl Gave Birth to Baby: पीडितेची लग्न झालेली मोठी बहिण माहेरी आली होती. यावेळी तिला घरात फरशीवर आणि स्वयंपाकघरात रक्ताचे डाग दिसले.

Pune Crime 15-year-old girl gives birth at home in Pune; Shocking incident of cutting the umbilical cord herself, accused arrested | Pune: अंगावर काटा आणणारी घटना..! पुण्यात १५ वर्षीय मुलीची घरातच प्रसूती; नाळही स्वतः कापली, आरोपी अटकेत

Pune: अंगावर काटा आणणारी घटना..! पुण्यात १५ वर्षीय मुलीची घरातच प्रसूती; नाळही स्वतः कापली, आरोपी अटकेत

पुणे - शहरातील नाना पेठ परिसरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरात एकटी असताना स्वतःची प्रसूती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्नाचं अमिष दाखवून या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी लहान असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर आईने दुसरे लग्न केले. ही मुलगी आणि तिचा भाऊ नाना पेठेत आत्याच्या घरी राहत होती. घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर जात असल्याने ती बहुतेक वेळा घरी एकटीच असायची.

दरम्यान ३१ जानेवारी रोजी पीडितेची लग्न झालेली मोठी बहिण माहेरी आली होती. यावेळी तिला घरात फरशीवर आणि स्वयंपाकघरात रक्ताचे डाग दिसले. संशय आल्याने तिने घरात शोध घेतला असता खिडकीत नुकतेच जन्मलेले अर्भक आढळून आले. याबाबत विचारणा केल्यानंतर पीडित मुलीने स्वतःच प्रसूती केल्याची आणि नाळ कापल्याची कबुली दिली. त्यानंतर संध्याकाळी कुटुंबीय घरी आल्यानंतर त्यांनी समाजात बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी याबाबत बाहेर कुठेही वाच्यता न करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, त्याच दिवशी पीडित मुलीची प्रकृती अचानक बिघडली. तिला आणि नवजात बाळाला तातडीने एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराचा खर्च जास्त असल्याने ते परत घरी आले. त्यानंतर पुन्हा प्रकृती खालावल्याने कॅम्प परिसरातील एका रुग्णालयात दोघांनाही दाखल करण्यात आले.

त्यानंतर मात्र मोठ्या बहिणीने तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघड झाला. आदिल फारुख शेख (वय २४) याच्यासोबत तिचे वर्षभरापासून संबंध होते. मार्च २०२५ मध्ये लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्याचे समोर आले.

मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही संबंध ठेवल्यामुळे आरोपीविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : पुणे: 15 वर्षीय लड़की ने अकेले बच्चे को जन्म दिया; आरोपी गिरफ्तार।

Web Summary : पुणे में, 15 वर्षीय लड़की ने घर पर अकेले बच्चे को जन्म दिया। उसने गर्भनाल खुद काटी। शादी का वादा करके यौन उत्पीड़न करने के आरोपी 24 वर्षीय व्यक्ति को POCSO अधिनियम के तहत गिरफ्तार किया गया है।

Web Title : Pune: 15-year-old delivers baby alone; accused arrested.

Web Summary : In Pune, a 15-year-old girl delivered a baby alone at home. She cut the umbilical cord herself. A 24-year-old man, accused of promising marriage and sexually assaulting her, has been arrested under the POCSO Act.