पीएसआय म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत १० लाखांना फसविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 14:29 IST2025-04-06T14:29:33+5:302025-04-06T14:29:49+5:30
आरोपीने २२ वर्षीय तरुणाला पीएसआय पदावर नोकरीला लावतो , असे आमिष दाखविले.

पीएसआय म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत १० लाखांना फसविले
पुणे : पोलिस उपनिरीक्षक म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत एकाने १० लाखांना फसविले. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव बाबूराव दराडे (३५) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दराडे याने २२ वर्षीय तरुणाला पीएसआय पदावर नोकरीला लावतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी १ मे २०२२ ते ४ मार्च २०२४ या कालावधीत आरोपीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फिर्यादीकडून वेळोवेळी १० लाख रुपये घेतले.
पैसे घेऊनही पीएसआयची नोकरी लागत नसल्याने तसेच दिलेले पैसे परत दराडे परत करत नसल्याने तक्रारदाराने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट २ चे सहायक पोलिस निरीक्षक रसाळ करीत आहेत.