पुणे कोर्टाचे कामकाज आता दोन शिफ्ट मध्ये. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्णय.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:05 AM2021-03-25T11:05:56+5:302021-03-25T11:07:01+5:30

खटल्याशी संबंधित लोकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश बंद.

Pune court to function in two Shifts. Detailed SOP prepared. Decision on the backdrop of increasing covid cases. | पुणे कोर्टाचे कामकाज आता दोन शिफ्ट मध्ये. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्णय.

पुणे कोर्टाचे कामकाज आता दोन शिफ्ट मध्ये. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्णय.

googlenewsNext


पुणे शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन आता कोर्टात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. यानुसार कोर्टाचे कामकाज आता दोन शिफ्ट मध्ये चालणार आहे. त्याबरोबरच ज्यांच्या खटल्याची सुनावणी आहे त्याच लोकांना न्यायालयाचा परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. काल यासंदर्भात बार असोसिएशन चा सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर ही नियमावली लागू करण्यात आली आहे. 

 उच्च न्यायालयाने लागू केलेल्या नियमावलीचा आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमावली नुसार  सदर SOP नुसार  न्यायालयीन कामकाज दोन शिफ्टमध्ये चालेल. पहिली शिफ्ट सकाळी १०.३० ते १ आणि दुसरी शिफ्ट १.३० ते ४ वाजेपर्यंत राहील. न्यायालयीन कामकाज करताना  कोणीही न्यायाधीश  वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी नसतील तर विरुद्ध आदेश पारित करणार नाहीत.. कोर्ट आवारात  वकील, साक्षीदार, आरोपी आणि व्यक्तीश: काम चालवणारे पक्षकार, ज्यांच्या तारखांची डेली बोर्डवर  नोंद असेल अशांना प्रवेश मिळेल.. कोर्ट हॉलमध्ये जोपर्यंत पुकारलं जात नाही , तोपर्यंत कोणीही आत मध्ये प्रवेश करावयाचा नाही. न्यायालयीन कामकाजांच्या दैनंदिन बोर्डवर  मोजक्याच कामांचा उल्लेख केला जाऊन , केवळ सदरची कामे चालवली जातील.तसेच कामकाज संपल्यानंतर संबंधित वकिलांना कोर्ट परिसरात ना थांबण्याची विनंती देखील बार असोसिएशन कडून करण्यात आली आहे. 

 

Web Title: Pune court to function in two Shifts. Detailed SOP prepared. Decision on the backdrop of increasing covid cases.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.