शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर दाम्पत्याचा मृत्यू; उपचारात त्रुटी नाहीत, सह्याद्रीला थेट ‘क्लीन चिट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 15:13 IST

पोलिसांकडील ही चौकशी अद्याप सुरू असून आरोग्य विभागाच्या समितीने सह्याद्री रुग्णालयाला दिलेली क्लीन चिट दिली असली, तरी अंतिम निष्कर्षासाठी जे. जे. रुग्णालयाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

पुणे: यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आरोग्य विभागाच्या उच्चस्तरीय समितीने सह्याद्री रुग्णालयाला उपचारात त्रुटी आढळल्या नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करत समितीने रुग्णालयाला एक प्रकारे ‘क्लीन चिट’ दिली असून, प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवरील स्थगितीही मागे घेण्यात आली आहे. मात्र पोलिसांकडील वैद्यकीय हलगर्जीची चौकशी अद्याप निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली नाही.

डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयात १५ ऑगस्ट रोजी यकृत प्रत्यारोपणानंतर बापू कोमकर यांचा मृत्यू झाला होता. दाता असलेल्या त्यांच्या पत्नी कामिनी कोमकर यांचेही २२ ऑगस्ट रोजी निधन झाले. या दोन मृत्यूमुळे कुटुंबीयांनी रुग्णालयावर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करून आरोग्य विभागाने यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मोहम्मद रेला यांच्या अध्यक्षतेखाली आठसदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती.

समितीने रुग्णालयातील सर्जरी प्रक्रिया, उपचार पद्धती, वापरलेली उपकरणे, तसेच रुग्णांच्या आरोग्यस्थितीचा सर्वांगीण अभ्यास करून गेल्या महिन्यात विभागाकडे अहवाल सादर केला. याचा आढावा घेण्यासाठी आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यीय राज्य सल्लागार समितीची बैठक ६ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात घेण्यात आली. समितीने सह्याद्री रुग्णालयाची बाजू ग्राह्य धरत उपचारात कोणतीही त्रुटी नसल्याचे निष्कर्ष नोंदवले. यानुसार, रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवरील स्थगिती मागे घेण्याचे आदेश २७ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले.

दरम्यान, कोमकर कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवर डेक्कन पोलिस ठाण्याने स्वतंत्र वैद्यकीय मत मागविण्यासाठी ससून रुग्णालयाशी संपर्क साधला होता. मात्र संबंधित तज्ज्ञ उपलब्ध नसल्याचे कारण देत ससून प्रशासनाने चौकशीस नकार दिला. परिणामी प्रकरण मुंबईतील जे. जे. रुग्णालयाकडे पाठविण्यात आले असून, तेथील समिती वैद्यकीय हलगर्जीबाबत स्वतंत्र तपास करत आहे. पोलिसांकडील ही चौकशी अद्याप सुरूच आहे. आरोग्य विभागाच्या समितीने सह्याद्री रुग्णालयाला दिलेली क्लीन चिट दिली असली, तरी अंतिम निष्कर्षासाठी जे. जे. रुग्णालयाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीच्या मृत्यूबाबत चौकशी करताना रुग्णांच्या उपचारांत कोणतीही त्रुटी नसल्याचे समितीच्या अहवालात नमूद आहे. - डॉ. भगवान पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Hospital Gets Clean Chit After Couple's Liver Transplant Deaths

Web Summary : Sahyadri Hospital cleared in couple's liver transplant deaths; no treatment errors found. Transplant surgeries resume. Police probe continues. JJ Hospital report awaited.
टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलJ. J. Hospitalजे. जे. रुग्णालयdeccan policeडेक्कन पोलीसhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूdoctorडॉक्टरsasoon hospitalससून हॉस्पिटल