पुणे : पेट्रोल पंपाशी संबंधित व्यवहार तातडीने पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत लष्कर भागातील पूना क्लबच्या संचालकांना धमकावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी भाजपचे प्रवक्ते तसेच शहरातील पेट्रोल विक्रेता संघटनेचे पदाधिकारी अली दारुवाला यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ४७ वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला या लष्कर परिसरातील प्रतिष्ठित पूना क्लबच्या संचालक असून त्या शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीत राहतात. पोलिसांच्या माहितीनुसार, दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी त्या पूना क्लबमधील जलतरण तलावाजवळील पार्किंगमधून कारने घरी जाण्यास निघाल्या होत्या. त्यावेळी अली दारुवाला हे दोन साथीदारांसह तेथे आले. त्यांनी तक्रारदारांच्या कारसमोर स्वतःची कार उभी करून अडथळा निर्माण केला.
गोल्व्हा नावाच्या व्यक्तीशी संबंधित असलेला पेट्रोल पंपाचा व्यवहार तात्काळ पूर्ण करण्याचा आग्रह धरत दारुवाला व त्यांच्या साथीदारांनी दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सुरुवातीला हा गुन्हा बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. मात्र, घटनेचे ठिकाण लक्षात घेऊन तो पुढील तपासासाठी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ हंडाळ तपास करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांनी दिली. दरम्यान, अली दारुवाला यांनी आरोप फेटाळून लावत हा केवळ व्यवहारातील गैरसमज असल्याचा दावा केला आहे.
Web Summary : Pune club director received threats to finalize a petrol pump deal. Police filed a case against a BJP spokesperson and two others for coercion and obstruction. The accused deny the charges, claiming it's a misunderstanding.
Web Summary : पुणे क्लब के निदेशक को पेट्रोल पंप सौदा करने के लिए धमकाया गया। पुलिस ने भाजपा प्रवक्ता समेत तीन लोगों के खिलाफ मामला दर्ज किया। आरोपियों ने आरोपों से इनकार करते हुए इसे गलतफहमी बताया।