Pune Car Accident : सदाशिव पेठेतील दुर्घटनेतील जखमींची चंद्रकांत पाटील यांनी केली विचारपूस

By राजू हिंगे | Updated: June 1, 2025 18:29 IST2025-06-01T18:29:16+5:302025-06-01T18:29:45+5:30

- जखमींना आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याच्या डॉक्टरांना सूचना

Pune Car Accident Chandrakant Patil questioned the injured in the Sadashiv Peth accident | Pune Car Accident : सदाशिव पेठेतील दुर्घटनेतील जखमींची चंद्रकांत पाटील यांनी केली विचारपूस

Pune Car Accident : सदाशिव पेठेतील दुर्घटनेतील जखमींची चंद्रकांत पाटील यांनी केली विचारपूस

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत शनिवारी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने दिलेल्या धडकेतील १२ पैकी तिघांची चंद्रकांत पाटील यांनी रविवारी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली. तसेच डॉक्टरांनाही तिघांवर उत्तमोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिघांची रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच, त्यांना लवकर आराम मिळावा, यासाठी आवश्यक ते सर्व उपचार करावेत, अशा सूचना दिल्या. यावेळी पाटील यांनी या घटनेच्या कारवाईचा आढावा पोलिसांकडून घेतला.

कारमालक, चालक आणि त्याच्या सोबतच्या सहप्रवाशाला ताब्यात घेतले असून, कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक गणेश फरताडे यांनी दिली.

Web Title: Pune Car Accident Chandrakant Patil questioned the injured in the Sadashiv Peth accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.