येरवडा प्रकरणातील गौरव आहुजाच्या मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 19:17 IST2025-03-08T19:16:32+5:302025-03-08T19:17:21+5:30

गुन्हे शाखेचे पोलिस पथक आणि पोलिस स्टेशन त्याचा शोध घेत आहेत.

pune breaking news Police take Gaurav Ahuja friend into custody in Yerawada case | येरवडा प्रकरणातील गौरव आहुजाच्या मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात

येरवडा प्रकरणातील गौरव आहुजाच्या मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात

- किरण शिंदे

पुणे -
येरवडा चौकात मद्यधुंद तरुणाने लक्झरी गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतुकीला अडथळा केला आणि सिग्नलवरच लघुशंका केली. यावेळी त्याच्या सोबत त्याचा मित्र भाग्यश ओसवाल हा गाडीत बसून होता. या भाग्यश ओसवालला आता पुणेपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन आरोपींपैकी भाग्यश ओसवाल नावाच्या एका आरोपीला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर दुसरा गौरव आहुजा सध्या फरार आहे. गुन्हे शाखेचे पोलिस पथक आणि पोलिस स्टेशन त्याचा शोध घेत आहेत.



ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, येरवडा घटनेतील मुख्य आरोपी गौरव अहुजाने  थेट त्यांच्या दिशेने अश्लील चाळे करत अनैतिक वर्तन केलं. ही गाडी गौरव मनोज अहुजाच्या वडिलांच्या नावावर गाडी नोंदणी आहे. या प्रकारानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चौकशीसाठी वडील मनोज रमेश अहुजा यांना ताब्यात घेतलं.

या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट उसळली आहे. एका उच्चभ्रू घरातील तरुणाने रस्त्यावर असा माज दाखवणं आणि सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन करणं अतिशय निंदनीय आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या वर्तनाचा निषेध करत लाज व्यक्त केली आहे. या घटनेनंतर त्याने मोबाईल बंद केला असून कुटुंबासह पोलीस त्याचा शोध घेत आहे. अशात हा तरुण कोण आहे असा प्रश्न चर्चेत आला आहे.

रस्त्यावर लघुशंका करणारा गौरव आहुजा कोण?

फेब्रुवारी 2021 मधे गौरव ला तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने  क्रिकेट बेटींगच्या गुन्ह्यात अटक केली होती. क्रिकेट बेटिंगमधे एक हाय प्रोफाइल रँकेट बस्ट करण्यात आले होते. त्यामध्ये गँगस्टर सचिन पोटेला मुख्य आरोपी करण्यात आले होते. या टोळीने कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेट बेटिंगमध्ये ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. गौरव अहुजा , सुनिल मखीजा तसेच अजय शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मिडिया सकाळपासून व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे गौरव आहुजा पुन्हा चर्चेत आला आहे.

Web Title: pune breaking news Police take Gaurav Ahuja friend into custody in Yerawada case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.