पुणे-अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:18 IST2025-12-03T15:18:46+5:302025-12-03T15:18:56+5:30
पुण्याला शिक्षण, आयटी, उत्पादन, स्टार्टअप्स, संशोधन, संरक्षण उद्योग आणि सांस्कृतिक वारसा या विविध क्षेत्रांत देश-विदेशात वेगळी ओळख

पुणे-अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू
पुणे : एअर इंडिया एक्स्प्रेसकडून मंगळवारी (दि.२) पुणे-अबू धाबी थेट उड्डाणसेवा सुरू करण्यात आली आहे. पुणे विमानतळावरून अबू धाबीसाठी नव्याने विमानसेवा सुरू झाल्यामुळे दुबई, बँकॉकनंतर अबू धाबीसाठीची ही तिसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली. त्यामुळे पुणेकरांना आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि प्रवासासाठी आणखी एक डेस्टिनेशन मिळाले आहे. या नव्या आंतरराष्ट्रीय मार्गामुळे पुण्याच्या नागरिकांसह व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थ्यांना आणि मध्यपूर्वेत कार्यरत असलेल्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुण्याला शिक्षण, आयटी, उत्पादन, स्टार्टअप्स, संशोधन, संरक्षण उद्योग आणि सांस्कृतिक वारसा या विविध क्षेत्रांत देश-विदेशात वेगळी ओळख आहे. अशा पार्श्वभूमीवर थेट आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांची उपलब्धता ही शहराच्या वाढत्या आर्थिक आणि औद्योगिक क्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. या नव्या उड्डाणामुळे परदेशी गुंतवणूक, व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना अधिक चालना मिळेल, ज्यामुळे पुण्याचे आंतरराष्ट्रीय पदचिन्ह आणखी विस्तारेल. नवी विमानसेवा सुरू झाल्यामुळे पुणे विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जा अधिक बळकट झाला आहे. या कनेक्टिव्हिटीमुळे फक्त प्रवास सुकर होणार नाही, तर जागतिक व्यापार, औद्योगिक संधी आणि नव्या बाजारपेठांमध्ये पुण्याच्या सहभागाला नवे दार खुले होणार आहे.
पुणे-अबू धाबी थेट उड्डाणाची सुरुवात ही शहराच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाची साक्ष देणारी आहे. मध्यपूर्वेशी कनेक्टिव्हिटी वाढल्याने व्यापार, उद्योग, पर्यटन, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. पुण्याच्या नागरिकांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील विमानतळ विकासाला आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला अभूतपूर्व गती मिळाली आहे. पुणे विमानतळाच्या सर्वांगीण विस्तारासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. - मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री, केंद्रीय नागरी उड्डाण व हवाई